बातम्या
अर्थसंकल्पात विकसित भारताचे प्रतिबिंब : प्रा.डॉ.एस.एम.देशमुख
By nisha patil - 2/13/2024 7:32:17 PM
Share This News:
कोल्हापूर दि.१३: संसदेत सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पातून शाश्वत विकसित
भारताचे प्रतिबिंब दिसत असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक व
मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ.एस.एम.देशमुख यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र अर्थशास्त्र विषयाअंतर्गत नुकत्याच संसदेत सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प यावर “अंतरिम अर्थसंकल्प - 2024 : एक दृष्टिक्षेप” या विषयावर विशेष ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते.त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे उपस्थित होते.यावेळी उपकुलसचिव डॉ.एस.एम.कुबल,श्री.सी.ए.कोतमिरे,समन्वयक,सहा.प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा.डॉ.देशमुख म्हणाले की,सबका साथ,सबका विकास या घोषवाक्यातून शाश्वत विकासाचा
मंत्र देण्याचे काम अर्थसंकल्प करतो. विकसित भारताची संकल्पना गतिशील करण्यासाठी सरकारी
योजनांचा फायदा सर्व सामन्यापर्यंत पोहचविण्याची यंत्रणा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात येत
आहे. तरुण,शेतकरी,महिला यांच्या सबलीकरणासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली
आहे.तरुणांसाठी कौशल्य व रोजगार देण्यासाठी विविध उपक्रम यासाठी आर्थिक तरतूद करण्यात
आलेली आलेली आहे.
शेतकऱ्यांना अन्नधान्य उत्पादनाची क्षमता वाढविण्यासाठी प्रगतीशील योजना आणण्यात
येत आहेत.महिला सबलीकरणासाठी विविध योजना राबविण्याचा मानस अर्थसंकल्प यातून दिसतो.या
अंदाजपत्रकात आरोग्य यंत्रणा सक्षम करणे, देशातील प्रत्येकाला घर देण्यासाठी प्रधानमंत्री आवास
योजना,टूरिझम,संरक्षण,कर इत्यादी क्षेत्राला प्राधान्य देण्यात आलेले आहे.भारतीय अर्थव्यवस्थेत
शेतीक्षेत्रातील मत्स्य व्यवसायाला प्राधान्य दिलेले आहे.२०४७ साली विकसित भारत करण्याच्या
अनुषंगाने विविध तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.जगातील पाच नंबरची भारतीय अर्थव्यवस्था
तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी अर्थसंकल्पात तरतुदी केलेल्या दिसून येत आहेत.त्यामुळे शाश्वत
विकासाची पाऊले अर्थसंकल्पात दिसून येते असल्याचे प्रा.डॉ.देशमुख सांगितले.
प्रा.डॉ.डी.के.मोरे म्हणाले, हा तुटीचा अर्थसंकल्प असून गोर-गरीब जनतेचे हित यातून जपल्याचे
दिसुन येते. त्यासाठी शासकीय योजना राबविण्याची आवश्यकता आहे,
यावेळी स्वागत व प्रास्ताविक समन्वयक सहा.प्राध्यापक डॉ.चांगदेव बंडगर यांनी केले,तर
पाहुण्यांची ओळख अर्थशास्त्र विषयाचे सहा.प्राध्यापक डॉ.प्रसाद दावणे यांनी करून दिली,सूत्रसंचालन
सहा.प्राध्यापक डॉ.नितीन रणदिवे यांनी केली तर सहा.प्राध्यापक डॉ.संजय चोपडे यांनी आभार मानले
अर्थसंकल्पात विकसित भारताचे प्रतिबिंब : प्रा.डॉ.एस.एम.देशमुख
|