बातम्या
रेशन धान्य दुकादारांनी ग्राहकांना मिळणाऱ्या योजनांचा तपशील लावणेबाबत
By nisha patil - 5/28/2024 8:40:16 PM
Share This News:
कोल्हापूर : प्रतिनिधी रेशन कार्ड वर मिळणाऱ्या धान्यांबाबत तसेच इतर मिळणाऱ्या सोयीची फाईल लावणेबाबत आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
सध्या रेशन कार्ड वर मिळणाऱ्या धान्याबाबत सर्व सामान्य जनतेत बरेचसे अज्ञान असल्यामुळे रेशन कार्ड धारकांत जनजागृती करण्याच्या हेतूने खालील मुद्दयावर कार्यवाही करावी ही विनंती.
1) प्रति रेशन कार्ड दरमहा किती धान्य मिळतं याची माहिती उपलब्ध करून देणारी गव्हमेंट ऑफिशियल वेबसाईट ची लिंक
प्रत्येक रेशन धान्य दुकानाच्या दर्शनी भागात लावण्यात यावी.
2) वैद्यमापन कार्यालयाकडून वजन काटा तपासणी केल्याचा दाखला दर्शनी भागात लावणे बंद करावे.
3) काही दुकानदार सर्वसामान्य जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन नागरिकांनी धान्य स्वीकारण्यासाठी आणलेल्या वस्तू
गोणपाट अथवा भांडे याचे वजन शून्य न करता धान्य देतात याबाबत सक्त सूचना करावी व जनजागृती फलकावर याची नोंद
करावी.
4) सध्या रेशन कार्ड वर मिळणारे धान्य अतिशय निकृष्ट दर्जाचे मिळत असल्याने शुद्ध धान्य मिळणे हा सर्वसामान्य
नागरिकाचा मानव अधिकार असून याबाबत तात्काळ सुधारणा करावी.
वरील मुद्द्याबाबत आपले स्तरावरून तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा संघटना याबाबत तीव्र
आंदोलन छेडील व त्यास सर्वस्वी आपण व शासन जबाबदार आहेत याची नोंद घ्यावी.
यावेळी भ्रष्टाचार समितीचे पदाधिकारी
उत्तम शिवाजी पवार,सुर्यकांत देशमुख, विजय कांबळे, प्रशांत माने,सुखदेव शेटे आदी उपस्थित होते.
रेशन धान्य दुकादारांनी ग्राहकांना मिळणाऱ्या योजनांचा तपशील लावणेबाबत
|