बातम्या
गोकुळ शिरगाव मधील ट्रक टर्मिनस ची आरक्षित जागा मिळणेबाबत
By nisha patil - 2/25/2024 1:38:32 PM
Share This News:
गोकुळ शिरगाव मधील ट्रक टर्मिनस ची आरक्षित जागा मिळणेबाबत
प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे कोल्हापूर तर्फे गेली 30 वर्षे आम्ही ट्रक टर्मिनस साठी असलेल्या आरक्षित जागेची मागणी राज्यशासनाकडे, कोल्हापूर जिल्हाधिकारी, कोल्हापूर महापालिका आयुक्त, प्रोजेक्ट रिपोर्ट व डिमांड ड्राफ्ट सह एम.आय.डी.सी(शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल) यांचे कडे मागणी केलेली आहे व करत आहोत की जेणेकरून आम्हा ट्रकधारकांना सर्व सोयी नियुक्त सुरक्षित वाहन तळ मिळेल वाहने पार्किंगला लावण्यासाठी जागा मिळेल सर्व ट्रान्सपोर्ट व अवजड वाहने एका तळावर होतील परंतु 30 वर्षे मागणी करून देखील आम्हास आज पर्यंत आरक्षित जागा मिळालेल्या नाहीत. गोकुळ शिरगाव जागेवरील आरक्षण काढावे ही बातमी वाचनात आली तरी सदरची जागा आम्हास ट्रक टर्मिनस साठी विकसित करून द्यावी अथवा आम्ही ती विकसित करू याचा गांभीर्याने विचार करून सदरची जागा तातडीने आम्हास द्यावी त्याचबरोबर कोल्हापूर महानगरपालिकेच्या ताब्यात असलेली तावडे हॉटेल नजीकची आरक्षित जागेवर ट्रक टर्मिनस उभा झाले पाहिजे आहे ही नम्र विनंती कळावे,
सदरचे निवेदन जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना देण्यात आलेले आहे आरक्षित जागेबाबत माहिती घेऊन आपणास कळवतो असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले
यावेळी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव उपाध्यक्ष भाऊ घोगळे, सेक्रेटरी हेमंत डिसले, खजानिस प्रकाश केसरकर, विक्रम पाटील आदी उपस्थित होते.
गोकुळ शिरगाव मधील ट्रक टर्मिनस ची आरक्षित जागा मिळणेबाबत
|