बातम्या
प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी 15 जुलै पर्यंत नोंदणी करा - विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार
By nisha patil - 4/7/2024 7:51:52 PM
Share This News:
खरीपहंगामसन2024 25 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना कोल्हापूर जिल्ह्यातील भात, ज्वारी, नाचणी, भुईमूग व सोयाबीन या पिकासाठी लागू आहे. ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी (कर्जदार/बिगर कर्जदार) ऐच्छिक असून खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीसुध्दा योजनेत भाग घेण्यासाठी पात्र आहेत. पीक नुकसानीची जोखीम पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे कार्य या योजनेतून होत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी 15 जुलै 2024 पर्यंत नोंदणी करुन सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी केले आहे.
योजनेतील सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखीमस्तर 70 टक्के इतका राहणार असून या योजनेअंतर्गत शेतकरी हिश्याचा भार सुध्दा शेतक-यांवर न ठेवता शेतकऱ्यांची विमा हप्ता रक्कम अनुदान म्हणून राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे त्यामुळे सन 2024-25 खरीप हंगामामध्ये शेतकरी अर्जदारांनी योजनेत सहभागी होताना प्रति अर्ज केवळ रक्कम 1 रुपया भरुन पिक विमा पोर्टलवर स्वत: शेतकऱ्यांना तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामुहिक सेवा केंद्र (सीएससी) यांच्या मार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येणार आहे. सामुहिक सेवा केंद्र (सीएससी) केंद्राने शेतक-यांकडून 1 रुपया व्यतिरिक्त कोणतीही जादा रक्कम घेतल्यास ते केंद्रधारक कारवाईस पात्र राहणार आहेत. सामुहिक सेवा केंद्र (सी एस सी) धारकाकडून केवळ 1 रुपये भरुन पीक विमा योजनेअंतर्गत सहभागाची नोंदणी करावी व सी.एस.सी केंद्र धारकांनी अतिरिक्त रकमेची मागणी केल्यास संबंधित विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच तक्रार नोंद करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 14599/ 14447 तरव्हॉटसअप नंबर 9082698142 असा आहे. ही योजना राबविण्यासाठी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि. या विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणी, लावणी न झाल्यामुळे (एकुण पेरणी क्षेत्राच्या 25 टक्क्यापेक्षा कमी पेरणी झाल्यास) होणारे नुकसान तसेच पिकांच्या हंगामामध्ये (सर्वसाधारण काढणीच्या 15 दिवस आधीपर्यंत) पूर, पावसातील खंड, दुष्काळ. इ. सारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांच्या सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर होणाऱ्या नुकसानीपासून विमा संरक्षण पुरविण्यात येत आहे. याशिवाय पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इ. बाबीमुळे उत्पन्नात येणाऱ्या घटीमुळे होणारे नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान तसेच नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात्त (काढणीनंतर 14 दिवसापर्यंत) नुकसान या बाबींसाठी विमा संरक्षण पुरविण्यात येत आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी पिकनिहाय विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता रक्कम (रु./हे) -पुढीलप्रमाणे-
भात (तांदूळ)- विमा संरक्षित रक्कम- 42 हजार रुपये, शेतकरी विमा हप्ता रक्कम -1 रुपया, ज्वारी खरीप- विमा संरक्षित रक्कम- 27 हजार रुपये, नाचणी- विमा संरक्षित रक्कम- 20 हजार रुपये, शेतकरी विमा हप्ता रक्कम -1 रुपया, भुईमूग- विमा संरक्षित रक्कम- 38 हजार रुपये, शेतकरी विमा हप्ता रक्कम -1 रुपया, सोयाबीन- विमा संरक्षित रक्कम- 49 हजार रुपये, शेतकरी विमा हप्ता रक्कम -1 रुपया असून विमा हप्ता भरावयाची अंतिम मुदत 15 जुलै 2024 आहे.
आवश्यक कागदपत्रे - विहित नमुन्यातील अर्ज, आधार कार्ड/आधार नोंदणीची प्रत, 7/12 उतारा, भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांसाठी करारनामा, सहमतीपत्र, पेरणी स्वयंघोषणापत्र, बॅक पासबुक प्रत.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण - खाते कार्यरत असणारी बॅक शाखा/ प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्था, संबधित विमा कंपनी कार्यालय, आपले सरकार सेवा सुविधा केंद्र ù(CSC), पिक विमा पोर्टल (www.pmfby.gov.in) अर्ज सादर करण्यासाठी शेतकऱ्यांनी विमा हप्ता रकमेव्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही. अधिक माहितीसाठी आपले बॅक खाते कार्यरत असणाऱ्या बॅक शाखेशी, आपले सरकार सेवा सुविधा केंद्र, कृषि विभागाचे क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी अथवा संबंधित विमा कंपनी प्रतिनिधींशी संपर्क साधावा.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी 15 जुलै पर्यंत नोंदणी करा - विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार
|