बातम्या
महाआवास योजनेतील घरकुलांची नोंदणी पत्नीच्या नावे करा : कार्तिकेएन एस.
By nisha patil - 11/1/2025 10:43:43 PM
Share This News:
घरकुल योजनेसाठी ७ हजाराचे उद्दिष्ट पूर्ण करून कोल्हापूर तिसऱ्या क्रमांकावर होता. यावर्षीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांना एकत्र घेऊन काम करूया, महाआवास योजतील घरकुलांची नोंदणी महिलांच्याच नावावर करा, असे प्रतिपादन कार्तिकेएन एस, यांनी केलंय. महाआवास अभियान २०२४-२५ जिल्हास्तरीय कार्यशाळा शुभारंभ आणि ग्रामविकास व पंचायत राज्य विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मिनी सरस प्रदर्शन सांगता समारंभात ते बोलत होते १०० दिवसांचे सुक्ष्म नियोजन करून योजनांचा लाभ लाभार्थ्यांना पोहचवा.
घरकुल योजनेसाठी गेल्यावर्षी ७ हजाराचे उद्दिष्ट पूर्ण करून कोल्हापूर तिसऱ्या क्रमांकावर होता. यावर्षीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांना एकत्र घेऊन काम करू, महाआवास योजनेतील घरकुलांची नोंदणी महिलांच्या नावे करा, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेएन एस, यांनी केलंय. जिल्हा परिषदेच्या महाआवास अभियान २०२४-२५ जिल्हास्तरीय कार्यशाळा शुभारंभ आणि ग्रामविकास व पंचायत राज्य विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मिनी सरस प्रदर्शन सांगता समारंभात ते बोलत होते.
ते म्हणाले, राज्य शासनाच्या सूचनाप्रमाणे पुढील १०० दिवसांचे सुक्ष्म नियोजन करून जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यत पोहचवा. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या घरकुल योजनांचा लाभ Y201 या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री सुर्यधर योजनेचा लाभ घेण्याबाबत प्रोत्साहीत करावे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १०० दिवसांत घरकूल बांधलेल्या भुदरगड, गगनबावडा, गडहिंग्लज, कागल, शाहूवाडी येथील लाभार्थ्यांचा सत्कार करून घराची प्रतिकृती भेट देण्यात आली. मिनी सरस विक्री प्रदर्शनात विक्रमी विक्री केलेल्या महिला बचत गटांना वृक्ष व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं .सरस प्रदर्शनातील टाकाऊ वस्तूपासून टिकावू वस्तूंचा स्टॉल लक्षवेधी ठरला. अतिरिक्ति मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी आभार मानले.
महाआवास योजनेतील घरकुलांची नोंदणी पत्नीच्या नावे करा : कार्तिकेएन एस.
|