बातम्या

9वी आणि 11 वी बोर्ड परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन सुरू

Registration for 9th and 11th board exam is open


By nisha patil - 9/13/2023 9:07:14 PM
Share This News:



केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं  कडून इयत्ता 9 वी आणि 11 वीच्या डेटा सबमिशनसाठी रजिस्ट्रेशन  प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासंदर्भात सीबीएसई बोर्डाकडून अधिकृत वेबसाईटवर निवेदनही जारी करण्यात आलं आहे. सीबीएसईकडून ही नोंदणी 2025 च्या परीक्षेसाठी करण्यात येत आहे. तुम्ही cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर ही नोटिस पाहू शकता. 
 

सीबीएसई बोर्डाने निवेदन जारी करत सांगितलं आहे की, इयत्ता 9 आणि इयत्ता 11 वीच्या विद्यार्थ्यांच्या डेटा सबमिशनसाठी नोंदणी प्रक्रिया  12 सप्टेंबरपासून सुरु करण्यात आली आहे. नोंदणी प्रक्रियेची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर आहे. याआधी नोंदणी करा. 12 ऑक्टोबर नंतर एक दिवसाची अधिक मुदत मिळेल पण, त्यासाठी विलंब शुल्क भरावे लागेल. दंड भरून तुम्ही 13 ऑक्टोबरपर्यंत रजिस्ट्रेशन करु शकता. 

सीबीएसई बोर्डाच्या रजिस्ट्रेशनसाठी भारतीय विद्यार्थ्यांना 2300 रुपये विलंब शुल्क भरावं लागेल. तर, परदेशी विद्यार्थ्यांसाठी 2500 रुपये विलंब शुल्क भरावं लागेल. पण, 12 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी केल्यास दंड भरावा लागणाप नाही. त्यामुळे त्याआधी रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करा
ऑनलाइन डेटा सबमिशनद्वारे नोंदणीकृत केलेले विद्यार्थीच 2025 मध्ये इयत्ता 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेला बसू शकतील. ही तयारी पुढील वर्षी होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षांसाठी आहे, त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करा. यामध्ये कोणताही निष्काळजीपणा होणार नाही याची सर्व विद्यार्थी आणि पालकांनी काळजी घ्या.


9वी आणि 11 वी बोर्ड परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन सुरू