बातम्या

ताकाचे नियमित सेवन केल्यास शरीर होईल बलवान

Regular consumption of buttermilk will make the body strong


By nisha patil - 9/3/2024 7:29:03 AM
Share This News:



शरीरातील विषारी पदार्थ ताकाच्या सेवनामुळे मूत्रावाटे बाहेर निघून जातात. आणि शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. यामुळेच शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास शरीराचे पंचकर्म आपोआप होऊन शरीरातील चरबी निघून जाते. चेहऱ्यावरील काळे डाग जातात, चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो, असे तज्ज्ञ सांगतात.
 

ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत. ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो. दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते. ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात. ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते. थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.

रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते. ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो. लहान मुलांना दात येतेवेळी त्यांना दररोज ४ चमचे असे दिवसभरातून २-३ वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो. तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास शरीराचे पंचकर्म आपोआप होते.

ताकात व्हिटॅमिन इ१२, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फर ही तत्वे असल्याने ती शरीरास लाभदायक आहेत. पोट साफ होत नसल्यास, पोटातून आवाज येत असल्यास ताक प्यावे. ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज नव्वद टक्के भरून निघते. शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. दररोज ताक प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन ताकद वाढते.नियमित ताक प्यायल्यास तब्येत तंदुरूस्त राहते.


ताकाचे नियमित सेवन केल्यास शरीर होईल बलवान