बातम्या
नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
By nisha patil - 11/3/2024 7:35:08 AM
Share This News:
गव्हाच्या तृणांचा रस प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. यामध्ये भरपूर मिनरल्स, व्हिटॅमिन ए, बी, सी, ई आणि के व्यतिरिक्त अमीनो अॅसिड्स असतात. या तृणारसाचे सेवन नियमित केल्यास सौंदर्यवृद्धी सुद्धा होते. शिवाय, अनेक आजार दूर करता येऊ शकतात. याच फायदे जाणून घेवूयात.
१) संधीवात
गहू तृणरसात जळजळ आणि सूज कमी करणारे मिनरल्स असतात. याच्या रसामध्ये कापूर भिजवून संधीवाताच्या ठिकाणी बांधल्याने फायदा होतो.
२) कोंडा
गहू तृणरसातील मिनरल्स आणि क्लारोफिल्स केसांना निरोगी बनवतात. तृणरस पंधरा मिनिटे केसांना लावून ठेवल्याने कोंडा दूर होतो.३) बद्धकोष्ठता
यातील मॅग्नेशियम बद्धकोष्ठता आणि आतड्यांचे आजार दूर करते.
४) रक्तदाब
हे नियमित प्यायल्याने रक्त शुद्ध होते. तसेच रक्तदाब नियंत्रणात राहतो.
५) एनीमिया
यामुळे रक्त वाढते. एनीमियासारखा रोग होत नाही.
६) पोटाचे आजार
हे नियमित प्यायल्याने अल्सर, गॅसेस, पोटदुखी, डायरिया आदी पोटाचे आजार दूर होतात.
७) लठ्ठपणा
गहू तृणरस थायराइड ग्लँड अॅक्टिव्ह करते. यामुळे जेवण पचन होते. मेटाबॉलिज्म लवकर होते. लठ्ठपणा कमी होतो.
८) अँटी एजिंग
गहू तृणरसात अनेक मिनरल्स आणि एन्जाइम्स असतात, जे सुपर ऑक्साइड फ्री रॅडिक्लस नष्ट करून म्हातापणाची प्रक्रिया स्लो करतात.
९) स्किन डिसिज
गहू तृणरसातील क्लरोफिल अँटीबॅक्टेरिअलच्या रूपात काम करतो. हे त्वचेवर लावल्याने खाज, जळजळ, एक्झीमासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
१०) दातांच्या वेदना
गहू तृणरस तोंडात ठेवल्याने अथवा तृण चावल्याने पायरिया, तोंडाची दुर्गंधी, दातदुखी सारख्या समस्यांमध्ये आराम मिळतो.
नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
|