बातम्या
सकाळी नियमित खा मोड आलेले मूग, होतील ‘हे’ ५ फायदे !
By nisha patil - 6/3/2024 7:32:34 AM
Share This News:
मोड आलेले मूग नियमित खाल्ल्यास आरोग्य चांगले राहते. यातील मॅग्नेशिअम, कॉपर, फोलेट, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशिअम तसेच एमिनो अॅसिड आणि पॉलिफेनॉल्ससारखी तत्व भरपूर असतात. यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे होतात. मूगडाळीतही व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई असते. रोज सकाळी मोड आलेले मूग नियमित खाल्ल्यास कोणते फायदे होतात, ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१. पोटदुखी
यातील फायबरमुळे पोटाचे विकार, पोटदुखणे या समस्या होत नाहीत.
२. पचनक्रिया
शरीरातील टॉक्सिक बाहेर काढण्यास मदत होते. पचनक्रिया चांगली राहते.३. त्वचा
यातील सायट्रोजन शरीरात कोलेजन आणि एलास्टिन कायम ठेवतात. याने चेहऱ्यावर वय दिसून येत नाही. चेहराही चमकदार राहतो.
४. ब्लड ग्लूकोज
शरीरात इन्सुलीन लेव्हल वाढण्यात मदत मिळते. ब्लड ग्लूकोज नियंत्रणात राहते. डायबिटीजची समस्या कमी होते.
५. रोगप्रतिकारशक्ती
रोगप्रतिकारकशक्ती वाढते. आजारांशी लढण्याची शक्ती वाढते.
सकाळी नियमित खा मोड आलेले मूग, होतील ‘हे’ ५ फायदे !
|