बातम्या

निलंबित पोलिस सुनील केदार याचा कोठडीत मृत्यू नातेवाईक आरोप

Relatives of suspended police officer Sunil Kedar s death in custody allege


By nisha patil - 3/15/2024 6:46:01 PM
Share This News:



वारणानगर इथून 3 कोटी रुपयाची रोकड लुटण्याचा प्रकार 2016 मध्ये घडला होता.या प्रकरणातील  संशयित निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे आणि  निलंबित पोलीस कॉन्स्टेबल सुनील  केदार या दोघात आर्थिक कारणावरून वाद होता. दरम्यान ऑगस्ट २०२३ मध्ये सांगोला जिल्ह्यातील वासूद इथ सुरज चंदनशिवे याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. सहायक पोलिस निरीक्षक सुरज चंदनशिवे यांच्या खून प्रकरणी सांगोला पोलिसांनी संशयित म्हणून अटक केलेला सुनील केदार आणि त्याचा साथीदार विजय केदार या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. हे दोघे संशयित २९ ऑगस्ट २०२३ पासून कळंबा कारागृहात होते. मधुमेह आणि निमोनियाचा त्रास वाढल्याने सुनील केदार याच्यावर गेल्या आठवड्यापासून सीपीआरमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान गुरुवारी सायंकाळच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याच डॉक्टरांनी स्पष्ट केल. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली.याची माहिती मिळताच आज सांगोला इथून सुनील केदार यांचे नातेवाईक सीपीआर इथ दाखल झालेत.याप्रकरणी  सुनील केदार यांचे  नातेवाईक धनंजय सावंत यांनी सुनील केदार याच्या मृत्यूविषयी संशय व्यक्त करत या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी आज केलीय.


निलंबित पोलिस सुनील केदार याचा कोठडीत मृत्यू नातेवाईक आरोप