बातम्या
अलमट्टी धरणातून 75 हजार क्युसेकने विसर्ग वाढवल्याने कोल्हापूर, सांगलीला दिलासा
By nisha patil - 7/27/2023 6:19:00 PM
Share This News:
कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या अलमट्टी धरणात पाणी पातळी 517.23 मीटर झाली आहे.अलमट्टी धरणात पाणी पातळी 517.23 मीटर झाली असून गेल्या 10 तासांपासून 1,75,711 क्युसेकने धरणात पाण्याची आवक सुरु आहे. सध्या धरणातून 75 हजार क्युसेकने विसर्ग सुरु आहे.गेल्या 10 तासांपासून 1,75,711 क्युसेकने धरणात पाण्याची आवक सुरु आहे.गेल्या 10 तासांपासून धरणातून 41,100 क्युसेकने विसर्ग सुरु होता.सध्या धरणातून 75 हजार क्युसेकने विसर्ग सुरु आहे.धरणात 87.355 टीएमसी (70.97 टक्के) पाणीसाठा झाला आहे.धरण पाणीक्षमता 123.01 टीएमसी आहे.कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसाने अलमट्टी धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.लमट्टी धरण व हिप्परगे बंधाऱ्याच्या पाणीसाठ्यावर कृष्णा व पंचगंगेची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते.कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज कोल्हापुरात बोलताना सांगितले की, 517.5 मीटर पर्यंत पाणीपातळी राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.कोयना धरणातही पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने कालपासून (25 जुलै) पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.धरणातून सध्या कोयना नदीपात्रात 1050 क्युसेकने विसर्ग केला जात आहे. कोयना धरणात 61.30 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.चांदोली धरणात 81 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात 27.86 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आज (26 जुलै) धरणातून 2456 क्युसेकने वारणा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.धरणातून विसर्ग सुरु करण्यात आल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 18 फुटांवर स्थिर आहे. सांगली जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण 100 टक्के भरले आहे. आतापर्यंत 5 ( 3, 4, 5, 6 व 7 ) स्वयंचलित दरवाजे उघडली आहेत. धरणातून 8540 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
अलमट्टी धरणातून 75 हजार क्युसेकने विसर्ग वाढवल्याने कोल्हापूर, सांगलीला दिलासा
|