बातम्या

थकवा घालवण्यासाठी उपाय

Remedies for fatigue


By nisha patil - 2/4/2024 7:32:00 AM
Share This News:



 शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे अनेकांना अशक्तपणा जाणवतो, दम लागतो, थोडे सुद्धा काम केले की  थकवा जाणवतो. ह्या साठी शरीरातील रक्त वाढवणे गरजेचे आहे

त्यासाठी खालील उपाय योजना करावी- 

◼️मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा.

◼️दररोज एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस  प्यावा. सफरचंद, बीटचा रस आणि चवीनुसार मध टाकल्यास लवकर रक्त वाढण्यास मदत होते.

◼️ नियमित बीट खावे. शक्यतो कच्या बिटाची koshambir खावी.

◼️रात्रीच्या जेवणानंतर शेंगदाणे आणि गूळ खावा.

◼️चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करावे.

◼️दोन चमचे तीळ दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. नंतर पाणी गाळून तिळआची पेस्ट करुन घ्या. यामध्ये मध मिसळून दिवसातुन दोन वेळेस हे मिश्रण खावे. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.

◼️तसेत दिवसातून दोन वेळेस थंड पाण्याने स्नान करा. आणि सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसा.

◼️दिवसातून एक वेळेस गवती चहा, दालचिनी, बडीशेप सम प्रमाणात घेऊन चहा तयार करुन प्या.

◼️बीट आणि लसणाचे नियमित सेवन करावे, त्यामुळे रक्ताचे प्रमाण वाढते.

◼️ टॉमेटोमध्ये भरपूर प्रमाणात 'व्हिटॅमिन सी' असल्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते.

◼️खजूर खाणे तसेच काळे मनुकेही रात्री भिजत ठेऊन सकाळी रिकाम्या पोटी खाणे.

◼️भाजी बनविण्यासाठी लोखंडी कढईचा वापर करा.

◼️रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी प्या 


थकवा घालवण्यासाठी उपाय