बातम्या

रात्री झोपण्यापूर्वी 'या' पाच सवयी लक्षात ठेवा

Remember these five habits before going to bed at night


By nisha patil - 11/16/2023 9:08:35 AM
Share This News:



आजची लाइफस्टाइल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळं अनेकांमध्ये लठ्ठपणाची समस्या तीव्र होत जात आहे. वजन कमी करण्यासाठी डायटिंग आणि व्यायामाचा आधार केला जातो.

मात्र, अनेकदा डाएट आणि रोज व्यायाम करुनही वजन हवं तस कमी होत नाही. याचाच अर्थ तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये काही कमतरता आहे. पण काळजी करु नका रोज रात्री झोपताना काही गोष्टी लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्ही झपाट्याने वजन कमी करु शकता.

रोज रात्री हे रुटीन करा फॉलो

वजन कमी करण्यासाठी रोज रात्री एक रुटीन फॉलो करा. जवळपास 15 दिवस हेच रुटिन फॉलो करा.

7 नंतर जेवण करणे टाळा

जर तुम्हाला वजन कमी करायचे आहे तर रात्री 7 वाजल्यानंतर चुकूनही जेवण करु नका. रात्री उशीरा जेवल्यानंतर जेवण पचवता येत नाही आणि लठ्ठपणा वाढतो. त्यामुळं आजच सातच्या आत जेवणाची सवय लावून घ्या. यामुळं तुमच्या वजनातही झपाट्याने बदल घडेल.

फायबरयुक्त पदार्थ खा

रात्रीच्या जेवणात नेहमीच लाइट आणि हेल्दी जेवण जेवले पाहिजे. फायबरयुक्त पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट करा. त्यामुळं रात्रीच्या जेवणात सलाड, सूप, डाळ, चपाती यांचा समावेश करा. यामुळं तुमचं पोट भरल्यासारखं राहिल आणि वजनही वाढणार नाही.

गरम पाणी पिण्याची सवय

तुम्हाला वजन कमी करायचे आहे तर जेवून झाल्यानंतर गरम पाणी प्या. त्यामुळं आरामात जेवण पचते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

पुरेशी झोप घेणे गरजेचे

झोप पूर्ण न होणे आणि लठ्ठपणा याचा थेट संबंध आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे आहे. तर रोज पुरेशी झोप घ्या. रोज आठ तास झोप घेणे आवश्यक आहे.

हळदीचे दूध

वजन कमी करण्यासाठी हळदीचे दूध खूप फायदेशीर आहे. हळदीच्या दूधामुळं रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्या मुळं आजपासूनच हळदीचे दूध पिण्याची सवय लावून घ्या.


रात्री झोपण्यापूर्वी 'या' पाच सवयी लक्षात ठेवा