बातम्या

केळी खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या

Remember these things while buying bananas


By nisha patil - 3/19/2024 7:29:20 AM
Share This News:



 केळी वर्षभर उपलब्ध असतात. त्याचे फायदे बरेच आहेत. सर्व वयोगटातील लोकांना दररोज केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. जीममध्ये व्यायाम करणारे एकाच वेळी बरीच केळी खातात.  ज्यामुळे त्यांना त्वरित ऊर्जा मिळते.  केळी खरेदी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे  या फळाचे गुण आणि चव अधिक मिळू शकेल.

रंगाकडे लक्ष द्या
पिवळ्या रंगाची चमकदार केळी घ्या.  त्यावर काळे डाग किंवा काळ्या खूणा असू नयेत. डागाळलेली केळी घेऊ नका, कारण ती त्वरीत खराब होतात.

वापरानुसार घ्या
कोणत्या हेतूसाठी केळी घेत आहात किंवा एका दिवसात किती केळी खाणार आहात,  त्यानुसार हे फळ घ्या. उदाहरणार्थ  कुटुंबासाठी केळी शेक करायचा असेल तर अधिक केळी घ्यावी लागतील. दुसरीकडे दररोज फक्त एक केळी खात असाल तर त्या संख्येने विकत घ्या.


आकार देखील महत्त्वपूर्ण
केळी मोठी आणि जाडसर घ्या.  पूर्णपणे पिकलेली केळी अधिक चवदार असतात.  आकार लहान असेल तर ते आतून कच्चे असू शकते. ज्यामुळे पोटाची समस्या देखील उद्भवू शकते.

केळीच्या सालावर हिरवटपणा दिसतो
केळीच साल हिरवट दिसल तर ते पूर्णपणे पिकलेले नसते. जर तुम्ही 7 केळी घेत असाल आणि तुम्ही त्याच दिवशी किंवा दुसर्‍या दिवशी खाणार असाल तर सर्व केळी पिवळी घ्या. दररोज एक केळ खायच असेल तर वरून हलके हिरवेगार केळ  घेणे चांगले होईल, जेणेकरून ती आठवडेभर  टिकतील. फळ घ्या. उदाहरणार्थ  कुटुंबासाठी केळी शेक करायचा असेल तर अधिक केळी घ्यावी लागतील. दुसरीकडे दररोज फक्त एक केळी खात असाल तर त्या संख्येने विकत घ्या.

आकार देखील महत्त्वपूर्ण
केळी मोठी आणि जाडसर घ्या.  पूर्णपणे पिकलेली केळी अधिक चवदार असतात.  आकार लहान असेल तर ते आतून कच्चे असू शकते. ज्यामुळे पोटाची समस्या देखील उद्भवू शकते.

स्वस्त केळ्याच्या मोहात पडू नका
केळी अनेकदा स्वस्त दारात मिळतात.  परंतू दोन दिवसात खराब होणारे हे फळ आहे. अशी केळी स्वस्त दरात मोठ्या प्रमाणात खरेदी केली तर त्यापैकी निम्मी फेकून द्यावी लागतील.


केळी खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या