बातम्या

टाऊन हॉल बस थांबा काढल्याने रुग्णांसह प्रवाशांची गैरसोय

Removal of Town Hall bus stop inconveniences patients and passengers


By nisha patil - 10/7/2023 5:07:52 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : कोल्हापुरातील सीपीआर चौक परिसरातील टाऊन हॉल इथं एसटी महामंडळाचा बस स्थानक आहे मात्र मोडकळीस आलेल्या बस स्थानकाच्या कामासाठी या ठिकाणचा बस थांबा काढलेला आहे. गेल्या एक महिन्यापासून या ठिकाणी बस थांबायचं कोणतेही काम सुरू केलेले नाही त्यामुळे थोरला दवाखाना असलेल्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसह कोकण भागातील येजा करणाऱ्या प्रवासाने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. हा बस थांबा तात्काळ उभा करावा अशी मागणी पार्टी च्या वतीने करण्यात आलेल्या याबाबतचे निवेदन परिवहन मंडळाचे विभागीय अभियंता मनोज लिंगराज यांना देण्यात आले. या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांचा प्रवाशांना पावसात भिजतच एसटी बसची वाट पहावी लागत आहे त्यामुळे बस थांबा तात्काळ उभारावा अशी मागणी काही प्रवासी आणि रुग्णांनी व्यक्त केली.


टाऊन हॉल बस थांबा काढल्याने रुग्णांसह प्रवाशांची गैरसोय