बातम्या
सेवा रुग्णालयाच्या रिकाम्या जागेतील अडगळ दूर करा: आम आदमी
By nisha patil - 6/28/2023 1:11:27 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम : कोल्हापुरातील लाईन बाजार येथे असणाऱ्या सेवा रुग्णालयाच्या रिकाम्या जागेत खूप वर्षापासून असलेले शेड आणि खरमाती तात्काळ काढून घ्या अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे शहर संघटक विजय हेगडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या वतीने याबाबतचे निवेदन सेवा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उमेश कदम यांना देण्यात आलं. गेल्या कित्येक सेवा रुग्णालयाच्या अखत्यारीतील रिकाम्या जागेत शेड आणि खरमाती पडून आहे या जागेत मोठ्या प्रमाणात अडगळ झाल्याने या ठिकाणी सापांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय त्यामुळे सेवा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसह इतर नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झालाय त्यामुळे या रिकाम्या जागेतील शेड आणि खरमाती काढून टाकावी अशी मागणी यावेळी विजय हेगडे यांनी व्यक्त केली. यावेळी विभाग प्रमुख समीर लतीफ विवेक भालेराव रमेश कोळी सर्प मित्र संग्राम जाधव यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
सेवा रुग्णालयाच्या रिकाम्या जागेतील अडगळ दूर करा: आम आदमी
|