बातम्या
सीपीआर रुग्णालयातील अपघात विभागाचे नूतनीकरण...
By nisha patil - 1/24/2025 6:11:27 PM
Share This News:
सीपीआर रुग्णालयातील अपघात विभागाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे अपघात विभाग 'गोदावरी इमारत' येथे सोमवार, २७ जानेवारीपासून स्थलांतरित करण्यात येणार आहे.
तसेच केसपेपर नोंदणी विभाग देखील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाच्या पश्चिमेस असणाऱ्या दगडी इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित करण्यात येत आहे. ही माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी दिलीय.
सीपीआर रुग्णालयातील अपघात विभागाचे नूतनीकरण...
|