बातम्या

तातडीने अपघात करा’ कर्नाटकात विचित्र फलक..

Report an accident immediately Strange sign in Karnataka


By nisha patil - 6/7/2024 5:38:27 PM
Share This News:



कर्नाटकमधील कोडगु येथील महामार्गाजवळ एक विचित्र फलक लागल्याचे आढळून आले आहे. सोशल मीडियावर या फलकाचा फोटो आता व्हायरल होत आहे. कन्नडमध्ये लिहिलेल्या संदेशाला इंग्रजीत भांषातर करताना झालेली चूक भलतीच व्हायरल झाली. कोडगु कनेक्ट या सोशल मीडिया हँडलवर सदर फलकाचा फोटो पोस्ट करण्यात आला. ज्यावर इंग्रजीत “Urgent Make An Accident” असे लिहिले गेले होते. “अतिवेग अपघातास कारणीभूत ठरू शकतो”, या कन्नड संदेशाचे भाषांतर करताना झालेली चूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.या गंमतीशीर फलकामुळे इंटरनेटवर मात्र सरकारवर टीका केली जात आहे. ‘तातडीने अपघात करा’, या भाषांतराची अनेकजण खिल्ली उडवत आहेत.


तातडीने अपघात करा’ कर्नाटकात विचित्र फलक..