बातम्या

महापालिकेतील विविध प्रश्नांसाठी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने अतिरिक्त आयुक्तांना निवेदन

Representation to Additional Commissioner on behalf of BJP Yuva Morcha for various issues in Municipal Corporation


By nisha patil - 7/21/2023 7:19:15 PM
Share This News:



भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज महापालिकेतील विविध प्रश्नांवर निवेदन देण्यात आले. प्रदेश कार्यकारणी सदस्य विराज चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी बोलताना  विराज चिखलीकर म्हणाले,चालू वर्षी पाऊस कमी पडल्यामुळे कोल्हापूर शहरात मध्ये एक दिवस आड पाणी येत आहे . या गोष्टीला पर्याय म्हणून सर्वसामान्य लोकांना  काही ठिकाणी महानगरपालिकेचे बोरिंग नादुरुस्त असल्यामुळे तेथे पाणी येत नसल्याचे सुचवले. कोल्हापुरात बंद असलेले बोरिंग परत सुरु करून सर्वसामान्य नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे असे सांगितलं. बोरिंग रिपेअरी करणे, व त्यासाठी लागणारे कर्मचारी हे काहीजण निवृत्त झाल्यामुळे तेथे कर्मचाऱ्यांची संख्या अपुरीआहे तसेच बोरिंग रिपेरी ची कामे प्रलंबित आहेत तसेच घरातील कचरा उठावासाठी असलेले टिप्पर गाड्या बहुसंख्य बंद अवस्थेत असल्याने टिपर वाहने सुरू करावीत असही सांगण्यात आलं गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने  जिल्हा प्रशासनाच्या मदतीला भारतीय जनता युवा मोर्चा ची टीम तयार असल्याचे यावेळी युवराज शिंदे यांनी सांगितल.
          नवीन नोकरी भरती  अतिरिक्त आयुक्त अडसूळ यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी 182 विविध पदांची भरती चे प्रस्ताव करण्याचे काम सुरू आहे तरी लवकरच कारवाई पूर्ण करून जाहिरात काढू असे आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिले.यावेळी जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे पाटील ,प्रदेश कार्यकारणी सदस्य विराज चिखलीकर, उपाध्यक्ष सुनील पाटील ,विश्वजीत पवार, ओंकार गोसावी ,युवराज शिंदे, अमित संकपाळ  , अनिकेत अतिग्रे  ,अमेय भालकर व कार्यकर्ते उपस्थित होते.


महापालिकेतील विविध प्रश्नांसाठी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने अतिरिक्त आयुक्तांना निवेदन