बातम्या
भाजपा जिल्हा कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न
By nisha patil - 1/27/2025 1:41:22 PM
Share This News:
कोल्हापूर, 26 जानेवारी : भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर जिल्हा कार्यालयात देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या धूमधामने साजरा करण्यात आला. शिवछत्रपती पुरस्कार विजेती आणि आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू स्नेहांकिता वरुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव आणि प्रदेश सचिव महेश जाधव यांनी जिलेबी खाऊन आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमात प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या राष्ट्रीय उत्सवाचा आनंद घेतला.
भाजपा जिल्हा कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न
|