बातम्या
रा. शाहूंच्या सामाजिक सलोख्याची परंपरा राखण्यासाठी शिक्षक सद्भावना यात्रेत सहभागी होणार : आमदार जयंत आसगावकर
By nisha patil - 6/21/2023 9:42:37 PM
Share This News:
राजश्री शाहू महाराजांनी विविध धर्माच्या लोकांमध्ये सलोख्याची परंपरा जोपासली. कोल्हापूरमध्ये धर्मांध ध्रुवीकरणाच्या राजकारण आता धर्मान शक्तींनी शाळा कॉलेजेस मध्ये आणले आहेत.याचा शिक्षक देखील बळी ठरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज फुले आंबेडकर यांची धर्मपेक्षता व सामाजिक सलोखा भाईचारा यांची परंपरा टिकवण्यासाठी कोल्हापुरातील सर्व शिक्षक कर्मचारी 25 जून रोजी होणाऱ्या शिवशाही सद्भावना यात्रेत हजारोंच्या संख्येने सहभागी होतील असे प्रतिपादन आमदार जयंत तासगावकर यांनी केले. ते जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ मुख्याध्यापक संघ व शिक्षण वाचन नागरिक कृती समिती यांच्या संयुक्त बैठकीमध्ये बोलत होते.
यावेळी बोलताना वसंत मुळीक म्हणाले,"खरा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम शिक्षकांचे आहे. यास बांधील राहून सद्भावना यात्रेत शिक्षकांनी सहभागी व्हावे.
मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ म्हणाले," शिक्षकांनी समाजाच्या जडणघडणीमध्ये आजपर्यंत मोलाची भूमिका बजावली आहे. राजर्षी शाहूंच्या विचारांचा जागर करण्यासाठी सद्भावना यात्रेत सहभागी व्हावे.
शिक्षण वाचवा नागरिक कृती समितीचे समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले," के आय टी कॉलेज मधील प्रा. तेजस्विनी देसाई यांची कोणती चूक नसताना त्यांच्या विरोधात धर्मांध संघटनांनी षडयंत्र रचून आगपाखड केली. आम्ही तेजस्विनी देसाई यांच्या पाठीशी असून समाजातील धर्मांध राजकारण आपल्या शाळा कॉलेजच्या आवारा बाहेर रोखण्यासाठी शिक्षकांनी शिवशाही सद्भावना यात्रेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी माध्यमिक शिक्षक संघाचे अनिल चव्हाण व सुटाचे प्रा. सुभाष जाधव, संजय कडगावे, शिवाजी भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले.
बैठकीमध्ये प्राध्यापिका तेजस्विनी देसाई यांना पाठिंबा दर्शवण्यात आला व संस्थेने त्यांच्या विरोधात कोणती कारवाई करू नये तसेच शिक्षकांनी मोठ्या संख्येने 25 जून रोजी शिवशाहू सद्भावना यात्रेत सहभागी होण्याचे ठराव करण्यात आले. यावेळी शिवाजी माळकर, को.जि.मा.शी. शिक्षक संघ अध्यक्ष आर.डी. पाटील, अनिल चव्हाण, प्राथमिक शिक्षक समितीचे संजय कडगावे,संजय पाटील,खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे शिवाजी भोसले, गोरख वातकर, शिवाजी सोनाळकर, शिक्षक सेनेचे संतोष आयरे, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे प्रसाद पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे राजेश वरक यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रा. शाहूंच्या सामाजिक सलोख्याची परंपरा राखण्यासाठी शिक्षक सद्भावना यात्रेत सहभागी होणार : आमदार जयंत आसगावकर
|