बातम्या

नागरिकांच्या प्रश्नांचा जलदगतीने निपटारा करा

Resolve citizens queries expeditiously


By nisha patil - 4/12/2023 7:27:25 PM
Share This News:



पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यामार्फत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार आयोजित करण्यात येतो. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील  250 हून अधिक अर्ज जनता दरबारात सादर झाले.  साधारण 750 हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

लोकांचे प्रश्नतातडीने निकाली होत असल्याने आपल्याला समाधानकारक वाटत असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. आज दाखल झालेल्याव मागील जनता दरबाराचे  सुमारे ५०० अर्जांवर तातडीने एका महिन्याच्या आत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असून जर अर्ज निकाली निघत नसेल तर त्याची कारणेही लेखी स्वरूपात संबंधित विभागाला द्यावी लागतील असे निर्देश  मुश्रीफ यांनी जनता दरबारात दिले

पालकमंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान आणि पी एम किसान योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी येणाऱ्या अडचणी चे निराकरण करा. नागरिकांनी सादर केलेल्या अर्जांबाबत त्यांना पुन्हा पुन्हा कार्यालयात जावे लागू नये, यासाठी निकाली न निघणाऱ्या अर्जांबाबत कारण नमूद करुन अर्जदारांना लेखी स्वरुपात अवगत करा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री यांनी प्रत्येक अर्जदाराशी चर्चा करुन संबंधित अर्ज निकाली काढण्यासाठी त्या त्या विभागाकडे दिला. 

यात सर्वसामान्य नागरिकांसह ज्येष्ठांनी आपल्या अडचणी पालकमंत्री श्री मुश्रीफ यांच्याकडे मांडल्या. यावेळी आमदार राजेश पाटील यांनी कुणबी जातीचे दाखले मिळण्याबाबतचा अर्ज सादर केला.  यावेळी आमदार पी. एन. पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, इचलकरंजी मनपा उपायुक्त तैमूर मुलाणी, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


नागरिकांच्या प्रश्नांचा जलदगतीने निपटारा करा