बातम्या
दूधगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा -वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
By nisha patil - 1/20/2025 9:58:26 PM
Share This News:
दूधगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न लवकर सोडवण्यासाठी कार्यवाही – मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर, दि. 20: दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांची लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत दूधगंगा प्रकल्पातील सर्व धरणग्रस्तांची जमिनी स्वामित्व योजनेअंतर्गत मोजणी करून प्रॉपर्टी कार्ड देण्याचे आदेश दिले.
तसेच, जमिनीबाबत अर्ज सादर करणे, संकलन रजिस्टर अद्ययावत करणे, आणि सरकारजमा करणे अशा कार्यवाहींचा आदेश दिला. मंत्री मुश्रीफ यांनी वनविभागासोबत लवकरच बैठक घेऊन पाण्याच्या पातळी बाहेर राहिलेल्या जमिनीचा मोबदला देण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अतिक्रमण हटवण्याचे कार्य सुरु असल्याचे सांगितले.
दूधगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा -वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
|