बातम्या
"महाराष्ट्राची जबाबदारी वाऱ्यावर टाकली"
By nisha patil - 1/29/2025 12:19:07 PM
Share This News:
"महाराष्ट्राची जबाबदारी वाऱ्यावर टाकली"
संजय राऊत यांची फडणवीसांवर टीका...
शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "फडणवीस नेहमी महाराष्ट्र सोडून बाहेर फिरत असतात. काही दिवसांपूर्वी दावोसला गेले होते, आता दिल्लीत प्रचारासाठी आहेत, त्यानंतर आणखी कुठे जातील, माहिती नाही.
मात्र महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्या शिरावर आहे, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे," असे संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.राज्यातील विविध मुद्दे प्रलंबित असताना आणि जनता महागाई व बेरोजगारीच्या समस्यांनी त्रस्त असताना, मुख्यमंत्री सतत महाराष्ट्राबाहेर का जात आहेत, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.
"महाराष्ट्राची जबाबदारी वाऱ्यावर टाकली"
|