बातम्या

जेव्हा हमसून हमसून रडलो होतो, तेव्हाचं निवृत्त झालो होतो - महेंद्र सिंग धोनी

Retired when Hamsun Hamsun cried  Mahendra Singh Dhoni


By nisha patil - 10/27/2023 7:09:12 PM
Share This News:



5 ऑगस्ट 2022... हा दिवस भारतातील क्रीडा रसिकांसाठी अतीव दुःखाचा दिवस होता म्हणाला   काही हरकत नाही. याचं कारण म्हणजे, याच दिवशी सर्वांचा लाडका आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या धमाकेदार कारकिर्दीनंतर चाहत्यांच्या लाडक्या धोनीनं सोशल मीडियावर पोस्ट करत आपली निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. अनेकांना आपले अश्रू आवरणंही कठीण झालं होतं. . एका कार्यक्रमात स्वतः धोनीनं यासंदर्भात माहिती दिली 
    . 2019 च्या विश्वचषक स्पर्धेतील हा सेमीफायनलचा सामना होता. धोनी रनआऊट झाल्यानं कोट्यवधी भारतीय हिरमूसले होते. धोनी स्वतःही हमसून हमसून रडला होता. सध्या धोनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
    व्हिडीओमध्ये धोनी म्हणतोय की, जेव्हा तुम्ही जवळचा सामना गमावता, तेव्हा भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण होतं. माझ्यासाठी तो टीम इंडियासाठी खेळण्याचा शेवटचा दिवस होता. मी वर्षभरानंतर निवृत्ती घेतली, पण खरं तर त्याच दिवशी मी निवृत्ती घेतलेली होती हेसत्य आहे. पण मला त्यावेळी ही  निवृत्ती घ्यायची नव्हती.


जेव्हा हमसून हमसून रडलो होतो, तेव्हाचं निवृत्त झालो होतो - महेंद्र सिंग धोनी