बातम्या

विवेकानंद मध्ये पी.एस.माने यांचा सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ संपन्न

Retirement Goodwill Ceremony of Shri P S Mane completed in Vivekananda


By nisha patil - 2/3/2024 1:20:18 PM
Share This News:



विवेकानंद मध्ये  पी.एस.माने यांचा सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ संपन्न

 पी.एस.माने यांनी 33 वर्षे सेवा प्रामाणिकपणे पार पाडली आहे.  त्यांनी संस्थेशी एकनिष्ठ राहून समाजाप्रती मी देणे लागतो या भावनेने आपली सेवा बजावली आहे.  आपणास दिलेले काम प्रामाणिकपणे पार पाडा. तरच असा सेवानिवृती सदिच्छा समारंभ होतो.  सेवानिवृती नंतरचे जीवन आरोग्यपूर्ण व्हावे यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.  असे प्रतिपादन विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार  यांनी  . पी.एस.माने  यांच्या सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना  केले. 

याप्रसंगी विवेकानंद कॉलेजच्या प्रशासकीय स्टाफतर्फे   पी.एस.माने  यांचा मा. प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार  यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ् व मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.

सत्काराला उतर देताना पी.एस.माने यांनी संस्थेने व महाविद्यालयाने सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.  कार्यक्रमाची सुरुवात संस्था प्रार्थनेने झाली.  प्रास्ताविक व स्वागत . हितेंद्र साळुंखे, प्रशासकीय कर्मचारी प्रतिनिधी व सहाय्यक ग्रंथपाल  यांनी केले.  मानपत्राचे वाचन महाविद्यालयाचे रजिस्ट्रार . आर. बी. जोग यांनी केले. आभार व सुत्रसंचालन महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. .नीता पाटील यांनी केले.  याप्रसंगी परीक्षा विभाग प्रमुख डॉ.जी.जे.नवाथे व  दिलीप बिरनाळे  यांनी मनोगत व्यक्त्‍ केले. या प्रसंगी प्राध्यापक व प्रशासकीय वर्ग उपस्थित होता.


विवेकानंद मध्ये श्री पी.एस.माने यांचा सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ संपन्न