शैक्षणिक
पीएम श्री संजीवन विद्या मंदिरात स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न...
By nisha patil - 1/3/2025 2:03:17 PM
Share This News:
पीएम श्री संजीवन विद्या मंदिरात स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न...
आम. डॉक्टर राहुल आवाडे यांची उपस्थिती लक्षणीय
चंदूर – पीएम श्री संजीवन विद्या मंदिर येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, नाट्य आणि गायनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली.
या सोहळ्याला आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. शाळेच्या शिक्षकवृंद, पालक व व्यवस्थापन समितीच्या मेहनतीने संपूर्ण संकुलात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
पीएम श्री संजीवन विद्या मंदिरात स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न...
|