राजकीय
मुंबईत महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीची आढावा बैठक
By nisha patil - 1/16/2025 3:19:07 PM
Share This News:
मुंबईत महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीची आढावा बैठक
रुग्णालयातून गतिमान वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्या : आ. प्रकाश आबिटकर
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचा आढावा घेणेसाठी आ. प्रकाश आबिटकरांनी मुंबई येथे बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी विमा सोसायटीने विमाधारक कामगारांसाठी या रुग्णालयांमधून दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश दिलेत.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचा आढावा घेणेसाठी आ. प्रकाश आबिटकरांनी मुंबई येथे बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी राज्य कामगार विमा सोसायटी कामगारांसाठी आपल्या १२ रुग्णालयांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा देत असते. राज्यात विमाधारक कामगारांची ४८ लाख ७० हजार ४६० कुटुंब आहेत. तर लाभार्थी संख्या दोन कोटी पर्यंत आहे. विमा सोसायटीने विमाधारक कामगारांसाठी या रुग्णालयांमधून दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश आबिटकरांनी दिलेत. राज्य कामगार विमा सोसायटीने मिळणाऱ्या निधीचा रुग्ण सेवेसाठी पुरेपूर उपयोग करावा. या निधीतून आरोग्य व्यवस्था बळकट करावी.
तसेच संलग्न केलेल्या 253 रुग्णालयांमधील उपचारांची कामगारांना माहिती होण्यासाठी जनजागृती करावी. रिक्त जागा भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी अशा सूचना यावेळी आबिटकरांनी दिल्या. सोसायटीच्या नव्याने मंजूर १८ रुग्णालयांसाठी भूसंपादन पूर्ण करावे. राज्य कामगार विमा सोसायटीने मागील तीन वर्षातील कार्य अहवाल सादर करावा. सोसायटीच्या कामकाजाचा दर महिन्याला आढावा घेण्यात यावा अशा सुचना दिल्या. बैठकीस आरोग्य सेवा आयुक्त अमगोतू रंगा नायक, राज्य कामगार विमा सोसायटीचे संचालक शशी कोळनुरकर, सहसचिव लहाने, सहसंचालक तुलसीदास सोळंके यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुंबईत महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीची आढावा बैठक
|