बातम्या

जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा

Review of various pending issues in the district


By nisha patil - 1/14/2025 1:04:31 PM
Share This News:



 जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा

कागल चेक नाक्या बाबत आवश्यक सुविधा उपलब्ध करा : ना. हसन मुश्रीफ

संकेश्वर ते बांधा राष्ट्रीय महामार्गावरील लाईटच्या कामकाजाबाबत दोन दिवसात निर्णय : ना. हसन मुश्रीफ

 सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत अधिकारी वर्गाचा ना. हसन मुश्रीफांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कागल येथील एमआयडीसी, संकेश्वर ते बांदा हायवे, गडहिंग्लज येथील क्रीडा संकुल, गडहिंग्लज तालुक्यातील प्रशासकीय इमारत, शहरातील अमृत २ या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामासंबंधी तसेच इतर विविध कामांबाबत बैठक घेण्यात आली. सर्व कामगारांना त्यांचे थकीत वेतन कोणत्याही परिस्थितीत देऊ अशी ग्वाही देखील देण्यात आली.   

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत अधिकारी वर्गाचा ना. हसन मुश्रीफांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कागल येथील एमआयडीसी, संकेश्वर ते बांदा हायवे, गडहिंग्लज येथील क्रीडा संकुल, गडहिंग्लज तालुक्यातील प्रशासकीय इमारत, शहरातील अमृत २ या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामासंबंधी तसेच इतर विविध कामांबाबत बैठक घेण्यात आली. गडहिंग्लज शहरातील व इतर गावांमधून जाणारा संकेश्वर ते बांधा हायवे वरील स्ट्रीट लाईट बाबत स्थानिकांचे अनेक प्रश्न होते. या विषयावर चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच स्थानिकांनी एकत्रित चर्चा करून स्ट्रीट लाईट बसवणे बाबत अंतिम निर्णय घ्यावा. याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा असेही पुढे सांगितले. तसेच त्यांनी सर्व कामगारांना त्यांचे थकीत वेतन कोणत्याही परिस्थितीत देऊ अशी ग्वाही ही दिली. जानेवारी २४ पर्यंत मुदत दिली असून यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. 

गडहिंग्लज शहरातील अमृत दोन या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामासंबंधी आढावा घेतला. कोल्हापूर शहराजवळ असलेल्या कागल चेक पोस्ट वरील विविध सुविधा तसेच स्थानिक वाहनांना सूट देणे बाबत विविध संघटना तसेच स्थानिकांनी मागणी केली. यावेळी आरटीओ कोल्हापूर, संबंधित चेक पोस्टचे प्रकल्प अधिकारी हितेश पाटील यांच्यासह विविध संघटनांचे तसेच स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. चेक पोस्ट परिसरातील विविध सुविधा तयार करणे बाबत व स्थानिकांना त्या ठिकाणी सूट देणे बाबत येत्या आठ दिवसात निर्णय घेण्याचे सूचना दिल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कुमार कार्तिकेन एस., अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह कागल, गडहिंग्लज तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी उपस्थित होते.


जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा
Total Views: 41