बातम्या

जिल्ह्यातील रिक्षा चालकांना मिळणार लवकरच खुषखबर...

Rickshaw drivers in the district will soon get good news


By nisha patil - 2/13/2025 6:28:02 PM
Share This News:



रिक्षा व्यवसायातील स्पर्धा वाढतच चालली आहे. घरोघरी उपलब्ध झालेल्या दुचाकी अशा विविध कारणांनी रिक्षा व्यवसायावर संकट आलंय. त्यामुळे जिल्ह्यातील रिक्षा चालकांना लवकरच सुखद बातमी मिळणार आहे. तर चार ते पाच रुपयांनी रिक्षा भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.

येत्या आठवड्यात यावर शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा आहे. गेल्या चार वर्षांपासून रिक्षा भाडेवाढ झालेली नाही. त्यामुळे भाडेवाढ करावी, अशी मागणी विविध रिक्षा संघटनांनी केलीय. यासंदर्भात खटुआ समितीने केलेल्या शिफारशी शासनाने स्वीकारल्या असून त्याआधारे रिक्षा भाडेवाढ ठरविण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या आगामी बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.


जिल्ह्यातील रिक्षा चालकांना मिळणार लवकरच खुषखबर...
Total Views: 46