बातम्या

बोंद्रेनगर परिसरातील ७७ कुटुंबाचे हक्काचे घर साकारत असल्याचा मनस्वी आनंद- आमदार सतेज पाटील

Rightful house of 77 families in Bondrenagar area MLA Satej Patil is very happy to be acting


By nisha patil - 10/21/2023 1:31:43 PM
Share This News:



बोंद्रेनगर परिसरातील ७७ कुटुंबाचे हक्काचे घर
साकारत असल्याचा मनस्वी आनंद- आमदार सतेज पाटील

 

-घरांच्या स्लॅब आणि रस्ते कामाचा शुभारंभ 
- आ. ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती

बोंद्रेनगर परिसरातील 77 बेघर कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून नवीन घर बांधून देण्याचे पुण्याईचे काम आपल्या हातून झाले याचा आपल्याला मनस्वी आनंद होत  आहे. या बेघर कुटुंबाचे हक्काचे घर साकारत असल्याचे पाहून अतिशय समाधान होत असल्याचे  प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले.  बोंद्रेनगर येथे बेघर कुटुंबांसाठी बांधण्यात येत असलेल्या घराचा स्लॅब आणि रस्ते-गटार कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

    बोंद्रेनगर फुलेवाडी येथील मातंग वसाहत परिसरातील कै. महिपतराव बोंद्रे हाऊसिंग सोसायटी येथे आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून 77 बेघर कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल देण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पुणे येथील शेल्टर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सहकार्याने या ठिकाणी 77 आरसीसी घरे बांधली जात असून पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत 53 लाख रुपये खर्च करून करण्यात येत असलेल्या रस्ते डांबरीकरण, ड्रेनेज लाईन आणि गृह प्रकलपाच्या पहिल्या टप्प्याचा स्लॅब कामाचा शुभारंभ करण्यात आला. 

यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, स्वतःच घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते.  या परिसरातील 77 बेघर कुटुंबांना लवकरच स्वतःचे घर मिळणार आहे.  आपल्या माध्यमातून नवीन घर बांधून देण्याचे काम पूर्णत्वाला जात आहे याचा आपल्याला मनस्वी आनंद होत आहे. 
 
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, आमदार सतेज पाटील यांच्या सहकार्यातून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील बेघर लोकांसाठी हा गृहप्रकल्प उभारला जात आहे. येथील लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर फुलेलेला आनंद पाहून मोठे समाधान लाभत आहे.

महिपतराव बोंद्रे गृह निर्माण संस्थेचे अध्यक्ष अशोक देगावे यांनी आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह बोंद्रे कुटुंबियांच्या योगदानाबद्दल आभार मानले. माजी नगरसेवक राहुल माने यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी  माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, इंद्रजीत बोंद्रे ,रीना कांबळे, अभिजित चव्हाण, अभिजित देठे, बँक ऑफ इंडियाच्या प्रतिनिधी शुभदा कुरकुटे, ठेकेदार राजेंद्र दीवसे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय बोंगाळे,  किरण पाटील,नागदेववाडीचे माजी सरपंच मंगेश गुरव, शरद निगडे, महिपतराव बेंद्रे हाऊसिंग सोसायटी संचालक भिकाजी वायदंडे, शीतल शिंदे, हिंदुराव गडकर, बाबुराव शिंदे, भीमराव आवळे, सदाशिव भौरे, इंजिनिअर अविनाश पोखरनेकर यांच्यासह भागातील नागरिकआणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बोंद्रेनगर परिसरातील ७७ कुटुंबाचे हक्काचे घर साकारत असल्याचा मनस्वी आनंद- आमदार सतेज पाटील