विशेष बातम्या

भाजलेल्या लसणापासून मिळतात भरपूर लाभ; जाणून घ्या

Roasted garlic has many benefits find out


By nisha patil - 4/6/2023 8:10:30 AM
Share This News:



लसूण तर सर्वांनाच माहिती आहे. स्वयंपाक करताना भाजी किंवा डाळीला तडका देण्यासाठी गृहिणी लसणाचा वापर करतात. लसणाची चटणीसुद्धा बनवली जाते.

लसूण खाण्याने हृदय मजबूत होते. याशिवाय त्याच्यामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे आरोग्य चांगले राहू शकते. अनेक आजारांवर गुणकारी असलेला लसूण पुरूषांसाठी तर खुपच लाभदायक आहे. लसूण खाण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.

लसणामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढविण्याचा गुण आहेत. हे हार्मोन्स पुरूषांची सेक्स लाईफ सुधारतात. सेक्स पावर वाढते.
लसणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड आढळते. यामुळे हृदय मजबूत होते. हृदयविकाराची शक्यता कमी होते.
लसणू खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि ताप दूर होतो. लसणात अँटीबायोटीक, अँटीव्हायरल, अँटीबॕक्टेरीयल आणि अँटीफंगल गुण असतात. त्यामुळे वायरल आजार दूर राहतात. यासाठी लसूण थोडासा भाजून खाऊ शकता.
फिटनेस चांगला ठेवायचा असेल तर रोज सकाळी रिकाम्यापोटी एक लसूण पाकळी चावून खा आणि त्यानंतर एक छोटा ग्लास कोमट पाणी प्या. काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल. यामुळे दिवसभर ॲक्टिव्ह कराल आणि फिटनेससुद्धा मजबूत होईल.
पचनक्रिया वाढविण्यासाठी लसूण रामबाण औषध आहे कारण लसणात भरपूर फायबर असते. ज्यामुळे पचनशक्ती वाढते.


भाजलेल्या लसणापासून मिळतात भरपूर लाभ; जाणून घ्या