बातम्या

तृतीयपंथीयांच्या वेशातील दरोडेखोरांचा धुमाकूळ ,चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशांची लूटमार

Robbers disguised as third parties


By nisha patil - 5/1/2024 6:01:42 PM
Share This News:



टी 20 विश्वचषक जिंकवून देणारा माजी क्रिकेटपटू जोगिंदर शर्माच्या  अडचणीत वाढ

भारताला टी 20 विश्वचषक जिंकवून देणारा माजी क्रिकेटपटू जोगिंदर शर्माच्या अडचणीत वाढ झाली आहे. जोगिंदर शर्मावर युवकाला जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी हरियाणामधील हिसारच्या आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जोगिंदरने 2007 च्या टी 20 वर्ल्डकपमधील शेवटचे षटक उत्कृष्टपणे टाकले होते. त्याने टाकलेल्या शेवटच्या षटकाच्या जोरावर भारताने हा वर्ल्डकप जिंकला होता.
 

जोगिंदर शर्मासह आणखी 6 जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. जोगिंदरसह इतर 6 जणांवर डाबडा या गावातील एका युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. पवन असे युवकाचे नाव आहे. दरम्यान, याबाबत मला कोणतीही माहिती नसल्याचे जोगिंदरने म्हटले आहे. जोगिंदर हिसारमध्ये डिएसीपी म्हणूनही कार्यकरत होता. 
 

आरोपींविराधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवाय त्यांच्यावर आणखी काही आरोपही आहेत. हिसारच्या आझाद नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी संदीप कुमार यांनी या प्रकरणी एफआर नोंदवली आहे. दरम्यान, लवकरच पुढील तपास करण्यात येईल. सबळ पुरावे हाती आले तर आम्ही आरोपींना अटक करु, असे आश्वासन पोलिसांनी पीडित पवनच्या कुटुंबियांना दिले आहे. 

जीवन संपवलेल्या पवन कुमारच्या कुटुंबियांनी जोगिंदर शर्मासह 6 आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.  अटक करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेहाला हात लावणार नाही, अशा इशाराही कुटुंबियांनी गुरुवारी  दिला होता. पवनचे कुटुंबीय आणि ग्रामीण भागातील काही नागरिक सीएमओ कार्यालयाबाहेर आंदोलनासाठी देखील बसले आहेत. अटकेशिवाय, कुटुंबियांनी सरकारी नोकरी आणि भरपाई म्हणून 50 लाख रुपयांची मागणी केलीय.


तृतीयपंथीयांच्या वेशातील दरोडेखोरांचा धुमाकूळ ,चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशांची लूटमार