बातम्या
भाऊसिंगजी रोडवरील सिमंधर ज्वेलर्स सराफी पिढीवर भर दुपारी दरोडा
By nisha patil - 6/2/2024 2:37:28 PM
Share This News:
भाऊसिंगजी रोडवरील जयेश जैन यांच्या simedr ज्वेलर्स या सराफी पेढीवर 25 जानेवारी रोजी भर दुपारी दरोडा टाकत अज्ञातानी 250 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या दहा दिवसात या गुन्ह्याची उकल करत तिघा परप्रांतीयांना ताब्यात घेतलय. त्यांच्याकडून सुमारे पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.स्थानिक गुन्हे शाखेच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी त्यांचे विशेष कौतुक केलय.
जयेश धनराज जैन यांचे भाऊसिंगजी रोडवर सिमंधर ज्वेलर्स नावाची सराफ पेढी आहे. 25 जानेवारी रोजी दुपारी
जैन हे पेढी बंद करून घरी जेवण करण्यासाठी गेले असताना अज्ञातांनी
भर दुपारी या दुकानाचे कुलूप बनावट चावीच्या सहाय्याने उघडून दुकानात प्रवेश केला.यावेळी चोरट्यांनी
दुकानातील रोकड आणि 250 ग्रॅम वजनाचे सोण्याचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी जयेश जैन यांच्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलिसात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हेची पथकाने अत्यंत कौशल्यपूर्णरित्या आणि तांत्रिकदृष्ट्या तपास करून कोल्हापुरात येणाऱ्या
परप्रांतीय कारागिरांची माहिती संकलित केली.ही चोरी परप्रंतिय कारागिरांनी केल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाल्याने पोलिसांनी तपासासाठी परराज्यात पथके रवाना केली होती.दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसाना
हा गुन्हा पिंटू जयसिंग राठोड यांने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने केला असून तो बेळगाव रोडवरील नीलकमल हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे सापळा रचून पिंटू राठोड यांच्यासह त्याचा साथीदार पुनमसिंग देवरा आणि केतनकुमार परमार अशा तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल. त्यांच्याकडून 62 हजार रुपये एक आयफोन सोन्याचे दागिने असा पंधरा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव शेष मोरे ,अंमलदार सुरेश पाटील हिंदुराव केसरे ,सागर माने, संजय कुंभार प्रकाश पाटील अमित सर्जे, सतीश जंगम, समीर कांबळे राजू कांबळे, रफिक आवळकर ,अशोक पवार सुशील पाटील अनिल जाधव राम कोळी विनोद कांबळे अमर अडुळकर विनोद चौगुले राजेंद्र वरंडेकर संजय पडवळ आणि सहकार्यानी मिळून केलीय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या दहा दिवसात या दरोड्याचा छडा लावल्याबद्दल पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी त्यांचे विशेष कौतुक केलय.
भाऊसिंगजी रोडवरील सिमंधर ज्वेलर्स सराफी पिढीवर भर दुपारी दरोडा
|