बातम्या

आरोग्याचा विचार न करता संगनमताने दरोडा -संजय पवार

Robbery with connivance without considering health Sanjay Pawar


By nisha patil - 4/4/2024 8:46:32 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी कसबा बावडा येथील जैव वैद्यकीय कचरा प्रकल्प गेली अनेक वर्षे कुठल्या ना कुठल्या कारणास्तव वादग्रस्त बनत चालला आहे.  त्याचा गंभीर फटका शहरातील व विशेषता आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्य , पर्यावरणाला बसत आहे. संबधित ठेकेदाराला ठेका देतानाच तीस वर्षाचा ठेका देण्यात आला, हे महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एकमेव उदाहरण आहे. या सर्व प्रकरणामध्ये प्रशासनातील व काही लोक प्रतिनिधींनी आर्थिक लाभ निश्चितच मिळवलेला आहे.
 

परंतु शरमेची बाब कचऱ्यासारख्या प्रकल्पात सुद्धा नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता संगनमताने दरोडाच घातला आहे. याबाबत खालील मुद्दे आम्ही आपल्या निदर्शनास आणून देवू इच्छितो,
कचरा आणण्यासाठी आपल्या विभागाने परवानगी दिली आहे का? असल्यास त्याचा खुलासा करावा?

 

१. सोलापूर मधून कोल्हापूर प्रकल्पावर
 

२. जर असा आरोग्य व पर्यावरणाचा घातक कचरा कोल्हापूर येथे आला आहे, तर
त्याचे संकलन, वाहतूक, प्रक्रिया व निर्मुलन आपल्या नियमाप्रमाणे झाले आहे का?
त्याची माहिती मिळावी.
शिवसेना पत्रकार ठाकरे ...

३. सोलापूर येथील कचरा कोल्हापूर येथील प्रकल्पावर जाळला असल्यास
त्यासंदर्भातील कचरा विल्हेवाट रिपोर्ट, डीझेल बिले, वाहतूक बिले, वजन पावत्या,
सीसीटीव्ही फुटेज, वाहनांचा तपशील, जीपीएस रिपोर्ट, बारकोड रिपोर्ट इत्यादी
कागदपत्रे मिळावी. सदर कंपनीला सोलापूर येथे जैव वैद्यकीय कचरा संकलन, वाहतूक, प्रक्रिया व
निर्मुलन करण्याचा परवाना नसल्याचे समजते, त्याचा खुलासा करावा.

 

५. सदर प्रकल्प कोल्हापूर शहर हद्दीत नागरी वस्तीत असताना कोल्हापूर महानगरपालिका हद्दीबाहेरील कचरा येथे का आणला जातो? वरील सर्व गंभीर प्रकरणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महानगरपालिका प्रशासनाची निष्क्रीयताच कारणीभूत असल्याने संबंधित ठेकेदारावर तातडीने चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत. अन्यथा आपल्या विरोधात  राष्ट्रीय हरित लवाद न्यायालय यांचेकडे दाद मागण्यात येईल.यावेळी  संजय पवार, विजय देवणे, विशाल देवकुळे, संजय जाधव, राहुल माळी, अभिजित बुकशेट यांनी उपप्रादेशिक अधिकारी माने यांना निवेदन देण्यात आले.


आरोग्याचा विचार न करता संगनमताने दरोडा -संजय पवार
Total Views: 1