बातम्या

रोहित पाटील यांची प्रकृती बिघडली

Rohit Patils condition worsened


By nisha patil - 3/10/2023 4:04:49 PM
Share This News:



शरद पवार यांच्या गटाचे  युवा नेते रोहित पाटील यांची तब्येत बिघडली आहे. रोहित पाटील यांचं पाणी प्रश्नावरुन उपोषण सुरु आहे. या दरम्यान त्यांची उपोषण दरम्यान तब्येत बिघडल्याचे समोर आले आहे

रोहित पाटील यांचं  उपोषण सुरु आहे. उपोषणस्थळी रोहित पाटील यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना ताप आल्याने डॉक्टर उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. टेंभू योजनेत तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यातील 17 गावांचा समावेश करा, या मागणीसाठी रोहित पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांचं  उपोषण सुरु आहे डॉक्टरांकडून रोहित पाटील यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रोहित पाटील यांना 102 डिग्री इतका ताप आहे. रोहित पाटील यांच्या अंगात ताप आल्याने ते उपोषणस्थळी सध्या झोपले आहेत. रोहित पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांची बहीण स्मिता पाटील या सुद्धा घटनास्थळी बसून आहेत. पाणी प्रश्नासाठी रोहित पाटील, आमदार सुमनताई पाटील यांचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी आंदोलनस्थळी जावून आमदार सुमनताई पाटील यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिलाय.


रोहित पाटील यांची प्रकृती बिघडली