बातम्या

बुद्ध विहार कामांमध्ये मुश्रीफांनी 50% मार्जिन घेतल्याचा रोहित पवारांचा आरोप..

Rohit Pawar alleged that Mushrif took 50margin in Buddha Vihar works


By nisha patil - 10/26/2024 4:11:37 PM
Share This News:



बुद्ध विहार कामांमध्ये मुश्रीफांनी 50% मार्जिन घेतल्याचा रोहित पवारांचा आरोप..

हसन मुश्रीफांच्या विकासकामांवर रोहित पवारांची टीका.. 

कामे 1500 कोटींची, मलिदा 700 कोटींचा..

मुरगूड येथे आयोजित परिवर्तन मेळाव्यात आमदार रोहित पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली. पवार यांनी आरोप केला की, मुश्रीफ यांच्या विकासकामांचा हिशेब 1500 कोटींच्या कामांसाठी घेतलेल्या 700 कोटींच्या मलिदावर आधारित आहे. त्यांनी बुद्ध विहारांच्या कामांमध्ये 50% मार्जिन घेतल्याचा आरोप केला.पवार म्हणाले, "मुश्रीफांनी कागदोपत्री रस्ते दाखवले, पण प्रत्यक्षात काही ठिकाणी रस्ते बनवलेच नाहीत. सर्व कामे काही विशिष्ट कंत्राटदारांनी घेतली, ज्यामुळे आता जनता त्यांच्या कारभारावर नाराज आहे."राजे समरजीत सिंह घाटगे यांनीही पालकमंत्री मुश्रीफ यांच्या अपयशावर टीका करत, "येथील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी पुणे-मुंबईला जावे लागते, हे पालकमंत्र्यांचे अपयश आहे," असे मत व्यक्त केले.


बुद्ध विहार कामांमध्ये मुश्रीफांनी 50% मार्जिन घेतल्याचा रोहित पवारांचा आरोप..