बातम्या

विधानभवनाच्या बाहेर रोहित पवारांच भर पावसात आंदोलन

Rohit Pawar protested outside the Vidhan Bhavan in the rain


By nisha patil - 7/24/2023 4:36:19 PM
Share This News:



विधानभवनाच्या बाहेर रोहित पवारांच भर पावसात आंदोलन

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी विधानभवनाच्या बाहेर आंदोलन करण्यासाठी एकटेचं बसले आहे. भर पावसात त्यांनी एकटेच बसून आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे .कर्जत येथील जामखेड परिसरातील एमआयडीसीला मंजुरी मिळाली पाहिजे म्हणून आंदोलन सुरू केले आहे. एमआयडीसीला मंजुरी मिळाण्याच्या मुद्द्यांवरून रोहित पवार हे सरकारकडे विनंती करण्यासाठी  विधानभवनाजवळ आंदोलनाला बसले आहेत. हे आंदोलन एकट्यानेच सुरु केले आहे. शासन स्तरावर कारवाई होत नसल्याने रोहित पवार आंदोलन करण्यासाठी बसले आहे. रोहित पवारांच्या भेटीला मंत्र्यानी देखील हजेरी लावली आहे. आमदार शशिकांत शिंदे, शेकापचे जयंत पाटील आणि सरकारकडून गिरिश महाजन भेटीस आले होते. पावसाळी अधिवेशन चालू असताना रोहीत पवार यांनी भुमिका मांडली आहे.


विधानभवनाच्या बाहेर रोहित पवारांच भर पावसात आंदोलन