बातम्या

रोहित शर्मा टी 20 वर्ल्डकप खेळण्याबाबत पत्रकार परिषदेत साधला माध्यमांशी संवाद

Rohit Sharma interacted with the media in a press conference about playing the T20 World Cup


By nisha patil - 12/25/2023 6:57:03 PM
Share This News:



रोहित शर्मा टी 20 वर्ल्डकप खेळण्याबाबत पत्रकार परिषदेत साधला माध्यमांशी संवाद 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. या परिषदेच दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्याबरोबरच वन डे वर्ल्डकप, महिलांचा कसोटी विजय याच्यावरही रोहित बोलला. याचबरोबर त्याला टी 20 वर्ल्डकप 2024 खेळणार की नाही याबाबत देखील प्रश्न विचारण्यात आला.

यावेळी रोहित शर्मा म्हणाला की, 'माझ्या समोर जे काही आहे ते मी खेळण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला काय म्हणायचं आहे हे मला कळतंय. याचं उत्तर तुम्हाला लवकरच मिळेल.' रोहितच्या या उत्तरामुळे तो टी 20 वर्ल्डकप 2024 खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


रोहित शर्मा टी 20 वर्ल्डकप खेळण्याबाबत पत्रकार परिषदेत साधला माध्यमांशी संवाद