बातम्या

रोहित शर्मा एक उत्तम कर्णधार, स्टाफचा आत्मविश्वास कायम राहण्यासाठी त्याने केला प्रयत्न

Rohit Sharma is a good captain


By nisha patil - 11/20/2023 3:41:48 PM
Share This News:



अहमदाबादमध्ये झालेल्या वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यामध्ये  ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा विकेट्सने पराभव केला. त्यानंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने कर्णधार रोहित शर्माच्या  कामगिरीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 
   

सामना संपल्यानंतर राहुल द्रविडने माध्यमांशी संवाद साधला. तो म्हणाला की, रोहित शर्मा एक उत्तम कर्णधार आहे. स्टाफचा आत्मविश्वास कायम राहण्यासाठी त्याने प्रयत्न केला. तो एक चांगला कर्णधार आणि सर्वांनाच नेहमी मदत करणारा व्यक्ती आहे. ड्रेसिंग रूममध्ये तो नेहमी इतर खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतो. कोणत्याही संभाषणासाठी तो नेहमी उपलब्ध असतो. तो नेहमीच वचनबद्ध असतो. या स्पर्धेसाठी त्याने बराच वेळ आणि योगदान दिलं आहे.


रोहित शर्मा एक उत्तम कर्णधार, स्टाफचा आत्मविश्वास कायम राहण्यासाठी त्याने केला प्रयत्न