बातम्या
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याबाबत रोहित शर्मा ......
By nisha patil - 3/5/2024 4:19:19 PM
Share This News:
रोहित शर्माला हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याचा अनुभव विचारण्यात आला. यावर रोहित शर्मा म्हणाला, 'बघा, हा जीवनाचा एक भाग आहे. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत नाही. हा एक चांगला अनुभव होता.' रोहित म्हणाला, 'यापूर्वीही मी अनेक कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे. हे माझ्यासाठी वेगळे किंवा नवीन नाही, असं रोहित शर्माने सांगितले. दरम्यान, महेंद्रसिंग धोनी, वीरेंद्र सेहवाग आणि विराट कोहली व्यतिरिक्त, रोहित फ्रँचायझी क्रिकेटमध्ये ॲडम गिलख्रिस्ट, हरभजन सिंग आणि रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली भारताकडून खेळला आहे.
हार्दिक पांड्यामुळे संघ संतुलित होतो, कर्णधाराला जास्त पर्याय मिळतात, दुसरा खेळाडू निवडणं कठीण असे अजित आगरकरने सांगितलं. अजित आगरकर म्हणाला की, उपकर्णधारपदाबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही. हार्दिक पांड्याने क्रिकेटपटू म्हणून काय केले, हे सर्वांना माहितेय. खेळाडू म्हणून त्याला बदलणे कठीण आहे. हार्दिक पांड्यामुळे कर्णधारालाही बरेच पर्याय उपलब्ध होत आहे. तो आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दीर्घ विश्रांतीनंतर परत येत आहे.
संघ जाहीर झाल्यानंतर निवड समिती प्रमुख अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी काल मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. रोहितला यावेळी मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावरुन हटवल्यावरुनही प्रश्न विचारण्यात आला. यावर देखील रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याबाबत रोहित शर्मा ......
|