बातम्या

रोमान्स, ड्रामा आणि इमोशन्स; जान्हवी आणि वरुणच्या 'बवाल' चा टीझर आला प्रेक्षकांच्या भेटीस

Romance Drama and Emotions


By nisha patil - 5/7/2023 4:27:46 PM
Share This News:



रोमान्स, ड्रामा आणि इमोशन्स; जान्हवी आणि वरुणच्या 'बवाल' चा टीझर आला प्रेक्षकांच्या भेटीस

तारा न्यूज वेब टीम  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन  आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांच्या 'बावल' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.  या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले असून साजिद नाडियादवाला यांनी निर्मिती केली आहे. 'बावल' या चित्रपटाच्या माध्यमातून वरुण आणि जान्हवी यांची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.वरुण आणि जान्हवी यांच्या 'बावल' या  चित्रपटाच्या टीझरमध्ये इमोशन, ड्रामा आणि रोमान्स दिसत आहे. टीझरच्या बॅकग्राऊंडमध्ये एक सॅड गाणेही ऐकू येत आहे. बावल चित्रपटाच्या टीझरसोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 21 जुलै रोजी अॅमोझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.


रोमान्स, ड्रामा आणि इमोशन्स; जान्हवी आणि वरुणच्या 'बवाल' चा टीझर आला प्रेक्षकांच्या भेटीस