बातम्या

थकलेल्या डोळ्यांना आराम गुलाब पाण्याचा, इन्फेक्शनही करतं दूर

Rose water relieves tired eyes


By nisha patil - 2/14/2024 7:41:50 AM
Share This News:



गुलाब पाण्याचा वापर त्वचेसोबतच डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठीही फायदेशीर ठरतो. गुलाब पाणी एक नैसर्गिक क्लिंजरचं काम करतं. गुलाब पाण्याचा उपयोग अनेक फेसपॅक तयार करण्यासाठीही होतो. आयुर्वेदिक उपायांमध्ये गुलाब पाण्याचा वापर डोळ्यांच इन्फेक्शन आणि अ‍ॅलर्जी दूर करण्यासाठी केला जातो. दिवसभर कम्प्युटर समोर बसून काम करणं, स्मार्टफोनचा वापर करणं अशा कामांनी थकलेल्या डोळ्यांना गुलाबपाणी आराम देतं आणि इन्फेक्शनही दूर करतं.
गुलाब पाण्यात कापूस भिजवून तो बंद डोळ्यांवर १५ मिनिटांसाठी ठेवा. 

जर डोळ्यांमध्ये जळजळ होत असेल किंवा डोळे लाल झाले असतील तर दोन- तीन थेंब गुलाब पाणी डोळ्यांमध्ये टाका. काही मिनिटांसाठी डोळे बंद करा. यामुळे डोळ्यांमधील धूळ आणि माती दूर होते. डोळ्यांच्या आसपास गुलाब पाणी लावल्याने डार्क सर्कल्स कमी होतात. तसेच डोळ्यांचा थकवाही दूर होतो. गुलाब पाणी डोकं शांत ठेवते. तसेच यामुळे चांगली झोप येते. यामध्ये असलेले फ्लोवोनॉइडमुळे हा फायदा होतो. गुलाब पाणी अ‍ॅन्टी-डिप्रेसेंट म्हणून काम करतं. पॅरासिटामॉल फारसं स्ट्राँन्ग नसतं परंतु यामध्ये वेदना दूर करण्यासाठी काही खास तत्व असतात. जे जखम भरून काढण्यासाठी मदत करतात.


थकलेल्या डोळ्यांना आराम गुलाब पाण्याचा, इन्फेक्शनही करतं दूर