बातम्या

रोटरीमध्ये जागतिक पार्किन्सन दिन उत्साहात साजरा

Rotary celebrates World Parkinsons Day with enthusiasm


By nisha patil - 4/13/2024 11:01:42 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर व पार्किन्सन डिसीज मुव्हमेंट डिसओर्डर सोसायटी मुंबई यांच्या संयुक्त विध्यमाने रोटरी समाज सेवा केंद्र,कोल्हापूरसंचलित, रोटरी पार्किन्सन पुनर्वसन केंद्र, कोल्हापूर. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर व रोटरी समाज सेवा केंद्र गेल्या ८० वर्षापासून समाज सेवा व रुग्णाच्या सेवेसाठी रोटरी फिजीओथेरपी सेंटर, रोटरी वाचा आणि श्रवण संस्था, राजर्षी शाहू ब्लड
बँक, कमलाकर नेवगी कर्णबधीर शिशु विद्यालय, रोटरी हायड्रोथेरपी सेंटर, प्रेरणा समुपदेशन केंद्र याच्या माध्यमातून अविरत काम करत आहे. पार्किन्सन आजाराचे रुग्ण व त्यांचा त्रास पाहून रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हे पार्किन्सन डिसीज मुव्हमेंट डीसऑडर सोसायटी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पार्किन्सन आजारावर काम करत आहे. हे केंद्र मुंबई, पुणे नंतर कोल्हापुरातील पहिलेच या आजारावर विना शुल्क काम करणारे भारतातील ६० वे केंद्र आहे. सध्याच्या धावत्या जीवनात आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष याचे मानवी जीवनावर परिणाम होत आहे. पार्किन्सन मधील व्यक्तींना त्या त्रासातून जावे लागत आहे. त्यांचे
आरोग्य तसेच उत्तम जीवन जगता यावे त्यांच्या जगण्याचा दर्जा सुधारावा म्हणून रोटरी या सामाजिक
उपक्रमावर विशेष काम करत आहे.

 

११ एप्रिल जागतिक पार्किन्सन दिनाचे औचित्य साधून आज दि. १३ एप्रिल रोजी पार्किन्सन ग्रस्त
लोकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पार्किन्सन लोकांनी नृत्य, गायन,
कविता वाचन इत्यादींचे सादरीकरण केले. या कार्यक्रमासाठी डायमंड हॉस्पिटलचे डॉ. कौस्तुभ
औरंगाबादकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष रो. सिद्धार्थ
पाटणकर, रोटरी समाज सेवा केंद्राचे अध्यक्ष रो. सुभाष मालू, पार्किन्सन केंद्राचे चेअरमन रो.अरुणकुमार गोएंका, इव्हेंट चेअरमन रो. दिलीप शहा प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर पार्किन्सन रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची उपस्थिती होती. तसेच रोटरीचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. पूनम शहा , प्रिया पाटील यांनी सूत्र संचालन केले. व अखेर रो. हरिश्चंद्र शर्मा यांनी उपस्थितांचे आभार मानले.


रोटरीमध्ये जागतिक पार्किन्सन दिन उत्साहात साजरा