बातम्या
रोट्रॅक्टर्स बनले कृषिमित्र शेतकरी बांधवाना मदत म्हणून केली भाताची लागवड.
By nisha patil - 7/24/2023 4:34:39 PM
Share This News:
कोल्हापूर . कोल्हापुरातील रोट्रॅक्टच्या सर्व क्लबच्या सदस्यांनी शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी "कृषीमित्र"हा अभिनव उपक्रम राबवला. कोल्हापुरातील कात्यायणी मंदिर परीसरातील शेतीच्या बांधावर जाऊन रोट्रॅक्ट क्लब च्या सदस्यांनी स्थानिक शेतकरी बांधवांच्या मदतीने भात शेतीची लागवड केली.
आकाशातून बसरणारा पाऊस, पायात घुडघाभर चिखल अशा कठीण परिस्थिती मध्ये देखील शेतकरी शेतात राब राब राबून प्रतिकूल परिस्थिती शेती करत असताना त्याला येणा-या अडचणी, त्यांचे कष्ट आणी श्रम कसे असतात, याची माहिती सर्वांना व्हावी, तसेच शेतकरी बांधवांना छोटीशी मदत व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविल्याचे रोट्रॅक्ट चे झोनल प्रमुख रो. अभिजित पाटील यांनी सांगितले.
रोट्रॅक्ट च्या सदस्यांनी दिलेल्या या सुखद भेटीबद्दल शेतक-यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी रोट्रॅक्ट च्या कोल्हापूर झोन मधील सर्व क्लबचे अध्यक्ष, सचिव आणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोट्रॅक्टर्स बनले कृषिमित्र शेतकरी बांधवाना मदत म्हणून केली भाताची लागवड.
|