बातम्या

आजरा शहरातील रवळनाथ देवालयायाच्या नुतन बांधणीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजुर – आमदार प्रकाश आबिटकर

Rs 5 crore fund approved for new construction of Rawalnath Devalaya in Azra city  MLA Prakash Abitkar


By nisha patil - 2/2/2024 11:04:38 PM
Share This News:



आजरा प्रतिनिधी, आजरा शहरासह तालुक्यातील भावीकांचे श्रध्दास्थान असलेल्या 700 वर्षापुर्वीच्या श्री रवळनाथ देवालयाच्या नुतन बांधणीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपकाव्दारे दिली आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, श्री रवळनाथ ग्रामदैवत हे साधारण 700 वर्षापूर्वीचे असून आजरा शहराच्या मध्यवस्तीत वसलेले आहे. मंदिर पूर्वी लाकडी व दगडी स्वरूपाचे होते. मंदिरामध्ये मोठे तीन चौक टप्पे होते. या मंदिराचा 1982 साली आजरा शहरातील नागरीकांनी जिर्णोध्दार केला. मंदिराच्या भोवताली अन्य मुख्य देवस्थाने असून भावेश्वरी, पालवेर, महादेव मंदिर, गणेश मंदिर असून शेजारीच मंदिर आहेत. या देवस्थानच्या यात्रा व रथोत्सवाला लाखोंच्या संख्येने भक्त येत असतात. श्री रवळनाथाची मुख्य यात्रा होत असून 10 दिवस भरगच्च कार्यक्रम असतात. या मंदीरास अनेक वर्षे झाली असून या मंदीराचा जिर्णोध्दार करून त्याची नव्याने बांधणी करण्याची मागणी येथील नागरीकांच्या वतीने करण्यात येत होती. त्याअनुषंगाने करण्यात आलेल्या पाठपुराव्यास यश आले असून मंदीर दगडी बांधणेसाठी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून नगरविकास विभागाकडून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

याकामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकार्य लाभले आहे.
 


आजरा शहरातील रवळनाथ देवालयायाच्या नुतन बांधणीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजुर – आमदार प्रकाश आबिटकर