बातम्या
चक्क भावाने पोलिसांचा गणवेश धारण करून परीक्षा केंद्रावर रुबाबाने आपल्या बहिणीला कॉपी पुरविण्याचा केला प्रयत्न
By nisha patil - 2/22/2024 7:29:10 PM
Share This News:
चक्क भावाने पोलिसांचा गणवेश धारण करून परीक्षा केंद्रावर रुबाबाने आपल्या बहिणीला कॉपी पुरविण्याचा केला प्रयत्न
एक धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यातील पातुर शहरातल्या शाहबाबू उर्दू हायस्कूल इथं बारावीच्या परीक्षा केंद्रावर घडला आहे.
यात चक्क भावाने पोलिसांचा गणवेश धारण करून या केंद्रावर रुबाबाने आपल्या बहिणीला कॉपी पुरविण्याचा प्रयत्न केला. मात्र हा कॉपी पुरविण्यासाठी आलेल्या तोतया पोलिसाचं सॅल्यूट करतानाच हे बिंग फुटलं आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. अनुपम मदन खंडारे असं या तोतया पोलिसांचं नाव आहे.इयत्ता बारावीच्या परीक्षांना बुधवार 21 फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे. तर त्यानंतर 1 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. शिक्षण विभागाने परीक्षेची तयारी सुरू केली असली तरी, यंदा जिल्हा प्रशासनापुढे कॉपीमुक्त परीक्षेचे आव्हान असणार आहे. बारावीच्या परीक्षेसाठी अकोला जिल्ह्यात 25 हजार 873 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. जिल्ह्याच्या 87 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येत आहे. पातुरच्या शाहाबाबु हायस्कुलच्या परीक्षा केंद्रावर एका परीक्षार्थींचा भाऊ अनुपम खंडारे हा कॉपी पुरवण्यासाठी थेट पोलीसाचा गणवेश परिधान करून तोतया पोलीस बनला.
त्यानंतर बहिणीला कॉपी देण्यासाठी परीक्षा केंद्रावर इकडे तिकडे फिरू लागला. तेवढ्यात पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके हे आपल्या ताफ्यासह या परीक्षा सेंटरवर बंदोबस्तासाठी पोहचले असता, तोतया पोलिसाची एकच तारांबळ उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाहता तोतया अनुपमनं त्यांना सॅल्यूट ठोकला. परंतु पोलिसांनी त्याचा सॅल्यूट पाहून त्याच्यावर संशय आला. तसेच त्याने घातलेला गणवेश, त्यावरील नेम प्लेट चुकीची असल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला.
चक्क भावाने पोलिसांचा गणवेश धारण करून परीक्षा केंद्रावर रुबाबाने आपल्या बहिणीला कॉपी पुरविण्याचा केला प्रयत्न
|