बातम्या

खुपिरेच्या बजरंग दूध संस्थेच्या निवडणुकीत सत्तारूढ पॅनल विजयी

Ruling panel wins in Khupires Bajrang Dudh Sanstha


By nisha patil - 11/2/2024 9:26:00 PM
Share This News:



दोनवडे (प्रतिनिधी) : खुपिरे (ता. करवीर) येथील बजरंग दूध संस्थेच्या निवडणुकीत कुंभी बँकेचे माजी संचालक आनंदा कृष्णात पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ पॅनेलने सर्वच्या सर्व जागा जिंकत विजय मिळवला. कुंभी बँकेचे माजी संचालक कै. कृष्णात माणकू पाटील यांचे चिरंजीव आनंदा पाटील व कुंभी-कासारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कै. तुकाराम दत्तात्रय पाटील यांचे पुतणे आकाराम पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनल मध्ये दुरंगी लढत झाली. यामध्ये आनंदा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने बाजी मारली आहे. त्यांना के. डी. पाटील व एस. डी. पाटील यांचे सहकार्य मिळाले. 

      विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी - लक्ष्मण शंकर जाधव (१९५),  राजेश सुभाना निकम (१९६), कृष्णात ज्ञानदेव पाटील (१८८), गजानन ज्ञानदेव पाटील (१८७), दत्तात्रय माणकू पाटील (१९५), दत्तात्रय शिवाजी पाटील (२०५), धनाजी तुकाराम पाटील (१८४), बळवंत नानू पाटील (१७३), सरदार पांडू पाटील (१७०), कृष्णात चंद्राप्पा बंगे (१८९),
 विमुक्त जाती /भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्ग -  मधुकर शिवाजी कोळी (२००)
 अनुसूचित जाती /जमाती -  महेश मारुती कांबळे (१९७),
 महिला राखीव -  कमल तानाजी पाटील (१७९) व मनीषा युवराज पाटील (१७७)
 इतर मागासवर्गीय -  सर्जेराव जोती शिंदे (१९३)


खुपिरेच्या बजरंग दूध संस्थेच्या निवडणुकीत सत्तारूढ पॅनल विजयी