अफवामुळे झाला छत्रपती संभाजी नगर मधील राडा

Rumors led to the rada in Chhatrapati Sambhaji Nagar


By nisha patil -
Share This News:



छत्रपती संभाजीनगर किराडपुरा भागात राम नवमीच्या पूर्वसंध्येला दोन गटात वाद झाला होता. त्यानंतर वादाचे रूपांतर दगडफेक आणि जाळपोळीत झाले. यावेळी पोलिसांच्या अनेक वाहने पेटवून देण्यात आल्या, तर काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील यात जखमी झाले होते. दरम्यान हा सर्व राडा कसा झाला याबाबत चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी एसआयटी पथकाची स्थापना केली आहे. दरम्यान एसआयटीच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अफवांमुळे झाला छत्रपती संभाजीनगरमधील राडा झाला असल्याचं देखील तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे तीन महत्त्वाच्या अफवांमुळे जमाव जमला आणि पुढे त्याचे रुपांतर दगडफेकीसह जाळपोळीमध्ये झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या राड्याप्रकरणी अनेक माहिती आता समोर येत आहे. तर या सर्व घटनेला फक्त अफवाच कारणीभूत असल्याचे देखील समोर आले आहे. सुरुवातीला दोन गटात किरकोळ वाद झाला. पोलिसांनी हा वाद मिटवला देखील होता. मात्र त्यानंतर काही लोकांनी सोशल मीडियावरुन अफवा पसरवल्या आणि त्यामुळे मोठा जमाव किराडपुरा येथे जमा झाला. "एका गटाच्या तरुणांना नाहक मारण्यात आले आहे, मारेकऱ्यांना पोलिसांनी मंदिरात लपवून ठेवले आहे, शहागंजमध्ये दंगल उसळली आहे," यासह काही अफवा पसरल्यानेच जमाव जमा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता अफवा पसरवणाऱ्या लोकांचा शोध पोलीस घेत आहेत.


Rumors led to the rada in Chhatrapati Sambhaji Nagar