स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा: विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

SPEED NEWS LIVE 24 CHANNEL 4TH ANNIVERSARY CELEBRATED WITH EXCITEMENT A host of dignitaries from various fields showered their best wishes


By nisha patil - 5/29/2023 4:20:37 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी  राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सहकार क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेण्यासोबतच माहिती आणि मनोरंजनाचा खजिना असलेल्या, स्पीड न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर चॅनलचा चौथा वर्धापन उत्साहात आणि प्रेक्षकांच्या अलोट गर्दीत संपन्न झाला. या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर सह राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दाखवत, स्पीड न्यूज लाईव्ह 24 वर शुभेच्छांचा वर्षाव केला. स्पीड न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर चैनल च्या वतीने वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रेक्षकांना केलेल्या आवाहानानुसार स्पीड न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर च्या प्रेक्षकांनी वही पेन आणि शैक्षणिक साहित्य सदिच्छा म्हणून भेट दिल्या. तर काहींनी विविध पुस्तके भेट दिली आहेत. या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे पुतणे गटविकास अधिकारी संदेश नाईक, गोवा शिवसेनेचे रवींद्र दावने,अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक,मल्हार सेनेचे महाराष्ट्र राज्य सरसेनापती बबनराव रानगे , शहर प्रमुख बाबुराव बोडके, मराठा महासंघाचे प्रताप नाईक,प्रकाश भाऊ पाटील, मनोज नरके, शिवाजी विद्यापीठ आजी माजी विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रवीण कोडोलीकर,कोल्हापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते विजय सिंह उर्फ रिंकू देसाई आणि सहकारी, आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप देसाई, अमरजा पाटील ,  पूजा वायदंडे ,शिवसेना ठाकरे गटाच्या उप जिल्हा संघटीका स्मिता सावंत मांडरे,उप शहर संघटीका माधवी लोणारे,
कोल्हापूर प्रेस क्लब चे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर,बी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी रवी कुलकर्णी कॅमेरामन दीपक सूर्यवंशी, एस पी एन न्यूज चॅनलचे प्रतिनिधी इकबाल रेठरेकर,जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीचे जिल्हा प्रतिनीधी अमर पाटील, डेली हंटचे पश्चिम महाराष्ट्र कॉर्डिनेटर प्रतिनिधी जावेद तांबोळी, दैनिक नवशक्तीचे कोल्हापूर कॉर्डिनेटर शेखर धोंगडे, माझा महाराष्ट्र चॅनल जिल्हा प्रतिनिधी मुबारक अत्तार, कॅमेरामन नाझिम अत्तार,मीडिया कंट्रोल वेब चॅनलचे प्रतिनिधी अजय शिंगे, पत्रकार निरंजन कामत, गोवा गोमंतक मराठीच्या श्रेया कुलकर्णी, लगोरी फाउंडेशनच्या सर्व संचालिका, ऊर्जा क्रिएशन्स चे अभिजीत सोकांडे,प्रेस मीडियाचे मुरलीधर कांबळे, कोल्हापूर जिल्हा पावरलूक असोसिएशनचे माजी अध्यक्ष पांडुरंग धोंडपुढे,अंकुश संघटनेचे दीपक पाटील,
 मनसे इचलकरंजी शहराध्यक्ष व वाहतूक सेनेचे अध्यक्ष प्रताप पाटील,विशाल पाचापुरे, मनसे कोल्हापूर शहर प्रमुख अजिंक्य शिंदे, महामंडळाचे गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त बाळासाहेब कांबळे, कोल्हापुरातील प्रसिद्ध हॉटेल महावीर चे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते महावीर अण्णा चौगुले,बैलगाडा शर्यत शौकीन सचिन गवळी, यांच्यासह सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक आणि सहकार क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी सदिच्छा भेट देत स्पीड न्यूज लाईव्ह 24 च्या वर्धापन दिनाची शोभा वाढवली. स्पीड न्यूज लाईव्ह 24 च्या व्यवस्थापकीय संचालिका ॲड. कल्पीता कुंभार ,संचालक श्रीनिवास नाझरे ,प्रोड्युसर सद्दाम  अली यांनी मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारल्या .यावेळी स्पीड न्यूज लाईव्ह 24 वेब चॅनलच्या प्रतिनिधी ॲड पूजा नाईकवाडे, प्रोग्रामिंग हेड सुरेखा शेजाळे, वेब  आणि सोशल मीडिया हॅण्डलर निशा पाटील ,वृत्त निवेदिका एडिटर रुचिता भालकर, व्हिडिओ जर्नलिस्ट ओंकार वळवडे, एडिटर केतन खाडे, निलेश लोहार, मंदार रेळेकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.


स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा: विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी केला शुभेच्छांचा वर्षाव